रणबीरने प्रेमात या अभिनेत्रींची केली फसवणूक, आत...

रणबीरने प्रेमात या अभिनेत्रींची केली फसवणूक, आता आलीयासोबत बांधतोय लग्नगाठ (Ranbir Kapoor Has cheated on These Actresses, Now Ready To Marry Alia Bhatt)

बॉलिवूडचे सर्वात क्यूट लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या १५ तारखेला पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्न करणार आहेत. सध्या दोघांचीही कुटुंबे जोरात लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. चाहत्यांनाही या दोघांना लवकरात लवकर वधू-वर बनताना पाहायचे आहे आणि ते या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

बॉलीवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर रणबीर कपूर आज आलियाला आपली अर्धांगीनी बनवण्यास आतुर असला, तरी आलिया त्याच्या आयुष्यात येण्याआधी त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत सुत जुळले होते, त्या सर्व अभिनेत्रींची त्याने प्रेमात फसवणूक केली आहे. चला तर मग जाणून घेऊया रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्‌सबद्दल.

दीपिका पादुकोण

रणबीर कपूरचे दीपिका पदुकोणसोबतचे प्रेमप्रकरण सर्वाधिक चर्चेत राहिले. दोघांनीही आपले प्रेम कधीच लपवले नाही. रणबीरच्या प्रेमात वेड लागलेल्या दीपिकाने त्याच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. पण तीन वर्षांनंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि ब्रेकअपचे कारण फसवणूक होती. दीपिकाने स्वतः सांगितले होते की, तिने रणबीरला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आपण दीपिकाची फसवणूक केली असल्याचे रणबीर कपूरनेही स्वतः कबुल केले होते.

कतरीना कैफ

अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात काम करताना रणबीर कतरिनाच्या प्रेमात पडला होता. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीने रसिकांची मने जिंकली. कतरिना कैफ आणि रणबीर कपूरचे वैयक्तिक आणि बोल्ड फोटो मीडियासमोर आल्यानंतर दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तबही झाले. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे वार्ता केली नसली तरी ते वरचेवर एकत्र दिसायचे. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती, पण नंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अन्‌ यावेळीही रणबीर कपूरवर कतरिनाला फसविल्याचा आरोप करण्यात आला. ब्रेकअपनंतर कतरिनाही डिप्रेशनमध्ये गेली होती, पण विकी कौशल तिच्या आयुष्यात आल्याने ती सावरली.

नरगिस फाखरी

रणबीर कतरिनाला डेट करत असतानाच त्याचे नाव अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत जोडले गेले होते. ‘रॉकस्टार’ चित्रपटात काम करत असताना दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यावेळी रणबीर कतरिनाबाबत गंभीर होता, तरीही त्याने नर्गिस फाखरीसोबत जवळीक वाढवण्यास मागेपुढे पाहिले नाही. रणबीरचे कतरिनासोबत ब्रेकअप होण्यामागे नर्गिस फाखरी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. नर्गिस आणि रणबीरने त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. अन्‌ रणबीरचे हे प्रेमही फार काळ टिकले नाही. त्याने कतरिना आणि नर्गिस या दोघींना गमावले.

सोनम कपूर

रणबीर आणि सोनम या दोघांनीही ‘सावरिया’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या टॉवेल डान्सने लाखो सौंदर्यवतींची मने तर जिंकलीच पण सोनम कपूरच्याही हृदयात रणबीरने घर केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि सोनममध्ये चांगले बॉन्डिंग असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते, पण नंतर माशी शिंकली आणि दोघे वेगळे झाले.

अवंतिका मलिक

इम्रान खानशी लग्न करण्यापूर्वी अवंतिका मलिक ही रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती, हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. दोघांच्या अफेअरची खूप चर्चाही झाली, पण रणबीरचे अवंतिकासोबतचे प्रेम पुढे न सरकता, मध्येच ब्रेक झाले.

आलिया आली…

यानंतर रणबीरच्या आयुष्यात आलिया भट्टची एन्ट्री झाली. रणबीर हा आलियाचा लहानपणापासूनचा क्रश होता, त्यामुळे जेव्हा दोघांना ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी साइन करण्यात आले तेव्हा दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांबद्दल गंभीर झाले. आता दोघांच्या लग्नाची तारीख समीप आली आहे तेव्हा दोघेही लग्न करणार यावर शिक्कामोर्तब करायला हरकत नाही. चाहते कधीपासून त्यांना वधू-वराच्या रूपात एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.