‘लग्नानंतर रणबीरमध्ये खूपच बदल झाला आहे’,...

‘लग्नानंतर रणबीरमध्ये खूपच बदल झाला आहे’, असं सांगून त्याची आई नीतू कपूर म्हणते, ‘आलिया आमच्या घरात आली याचा खूप आनंद आहे'(Ranbir Kapoor has changed after his marriage, reveals Neetu Kapoor, ‘I am happy and feel lucky that Alia has come into our family)

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. पण त्यांच्यासोबतच आणखी कोणी जास्त खुश असेल तर रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर. अनेकदा कॅमेऱ्यांमध्ये नीतूची खुशी कैद झाली. बऱ्याचदा त्यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्या सुनेचे मनभरुन कौतुक केले आहे. आता पुन्हा एकदा, आलिया घरात कुटुंबाचा भाग झाल्यापासून काय काय बदल झाले, लग्नानंतर रणबीरमध्ये कोणते बदल झाले हे सांगताना नीतू यांनी त्यांच्या सुनेचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नीतू यांनी सांगितले की, आलियाचे त्यांच्या मुलासोबत लग्न झाल्यामुळे त्यांच्या मुलामध्ये आणि कुटुंबात खूप बदल झाले. आज मी खूप खुश आहे कारण आलियाने रणबीरला खूप प्रेम आणि आनंद दिला. मला रणबीरमधला बदल जाणवतो. ते दोघे एकत्र खूप छान दिसतात. मी खूप खुश आहे आणि स्वत:ला खूप नशीबवान समजते कारण आलिया आमच्या कुटुंबाची सदस्य बनली. तिच्या येण्यामुळे आमचे आयुष्य खरचं खूप बदलले आहे. आधी मुलाचे लग्न झाले नाही म्हणून चिंता असायची पण आता ते ही झाल्यामुळे मी चिंतामुक्त आहे.

रणबीर आलियाने इतर सेलिब्रेटींप्रमाणे डेस्टीनेशन वेडिंग केले नाही. त्यांनी घरातच लग्न केले. त्यांच्या लग्नात जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रणबीर आलियाच्या लग्नाबाबत नीतूने सांगितले की, लग्न हे मोठं महागडचं असलं पाहिजे असे काही नाही. त्याऐवजी तुम्हाला ज्या ठिकाणी आनंद मिळतो आणि जिथे तुमचे कुटुंब आनंदी असेल तिथे लग्न करावे. नाहीतर दुसऱ्यांना खुश करण्यातच संपुर्ण वेळ निघून जातो.

नीतू यांनी यापूर्वी ही त्यांच्या सुनेचे कौतुक केले आहे. त्यांच्या घरात सुख केवळ आलियामुळे आलं या मतावर त्या ठाम आहेत. तर आलियाचे सुद्धा तिच्या सासूसोबत खूप घट्ट नाते आहे.