बेडरुममधील आलियाच्या या सवयीमुळे रणबीर झाला है...

बेडरुममधील आलियाच्या या सवयीमुळे रणबीर झाला हैराण, अभिनेत्याने केला खुुलासा (Ranbir Kapoor Gets Upset by This Act of Wife Alia Bhatt in The Bedroom, Actor Revealed)

सध्या रणबीर आणि आलिया कपूरची जोडी खूप चर्चेत असते. या जोडप्याने एप्रिल महिन्यात एकमेकांशी विवाहगाठ बांधली त्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमात एकत्रच उपस्थिती लावतात.  कॅमेऱ्यासमोर सुद्धा दोघेही रोमॅण्टिक पोज देत असतात

.सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी चालू असताना सुद्धा ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कमाई केली. त्यामुळे हे कपल सध्या खूप चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आतापर्यंत ४५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र अजूनही अनेक लोक हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी रणबीर आणि आलियाने अनेकदा आपले वैयक्तिक आयुष्य आपल्या चाहत्यांशी शेअर केले. अशाच एका मुलाखती दरम्यान रणबीरने आलियासंबंधी एक खुलासा केला. त्यावेऴी आलिया सोबत झोपताना किती त्रास सहन करावा लागतो हे त्याने सांगितलं.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूर ला आपल्या पत्नीच्या म्हणजेच आलिया भट्टच्या काही सवयी विचारल्या. त्यावेळी तो म्हणाला की आलियाची स्लीपिंग पोझिशन खूप विचित्र आहे. रात्री ती बेडवर पूर्ण हात पाय पसरून झोपते. आणि झोपेतच बेडवर गोल फिरत असते. त्यामुळे मला एका कडेला झोपावे लागते. आलियाच्या या सवयीमुळे मला रोज झोपताना स्ट्रगल करावा लागतो.

त्यानंतर आलियाने सुद्धा त्याची एक वाईट सवय सांगितली. ती म्हणाली की मला रणबीरचा शांत स्वभाव आवडतो. तो माझ्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकतो. पण काही वेळेस मला असे वाटते की, महत्त्वाच्या ठिकाणी त्याने बोलणे जरुरी असते पण तो त्यावेळी सुद्धा गप्प राहतो. अशावेळी त्याची शांतता मला त्रास देते.

रणबीर आणि आलियाचे १४ एप्रिलला लग्न झाले होते. त्याआधी पाच वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केले. सध्या आलिया आपला गरोदरपणाचा काळ आनंदात घालवत आहे.

या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ब्रह्मास्त्र नंतर ही जोडी अॅनिमल या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा असेल. याशिवाय रणबीर श्रद्धा कपूर सोबत सुद्धा एका आगामी चित्रपटात दिसणार आहे. तर आलिया लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात सुपरस्टार रणवीर सिंह सोबत दिसणार आहे. तसेच तिने नुकताच तिचा पहिला वहिला हॉलिवूड चित्रपट हार्ट ऑफ स्टोनचे पोस्टर शेअर केले.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम