गरोदरपणामुळे आलियाच्या वाढलेल्या वजनाची रणबीरने...

गरोदरपणामुळे आलियाच्या वाढलेल्या वजनाची रणबीरने केली गंमत, पण नेटकऱ्यांनी केले ट्रोल (Ranbir Kapoor Gets Brutally Trolled For Fat Shaming Pregnant Wife Alia Bhatt, Watch)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघेही अनेक प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकत्र उपस्थिती लावतात. अशाच एका प्रमोशन दरम्यान रणबीरने आलियाच्या शरीराबद्दल असे काही म्हटले ज्यामुळे तो खूप ट्रोल होत आहे.

आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक लाइव्ह सेशन करत होते. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीही उपस्थित होते.

या यूट्यूब लाइव्ह मुलाखती दरम्यान रणबीरने सांगितले की, प्रेग्नंसीमुळे आलियाच्या शरीरात बरेच बदल झाले आहेत, जे ऐकून आलिया आश्चर्यचकित झाली आहे. व्हिडिओमध्ये बोलत असताना आलिया म्हणते, अनेकजण आम्हाला विचारतात की आम्ही सर्वत्र पसरत का नाही.

यावेळी आलियाला टोकत रणबीर मुद्दाम आलियाला चिडवण्यासाठी तिच्या बेबी बंपकडे बघत म्हणतो की, मला दिसतंय कोण पसरत चाललंय. रणबीरच्या या कमेंटमुळे आलियाला खूप धक्का बसला. ती आश्चर्यचकित होऊन एकदा आपल्या बेबी बंपकडे आणि एकदा रणबीरकडे पाहू लागली.

त्यानंतर रणबीर स्वत:च्या बोलण्यावर हसत आलियाच्या खांद्यावर थोपटून मी गंमत केली असे म्हणतो. मग दोघेही हसायला लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. पण यूजर्स मात्र रणबीरवर संतापले आहेत.काही यूजर्सनी अपमानास्पद असे कमेंटमध्ये लिहिले आहे, तर एकाने लिहिले की, आलियाने तुला काका असे म्हणून तुझा कधीच अपमान केला नाही.

तर काहीजण म्हणत आहेत की, लोक उगीच पराचा कावळा करत आहेत, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. दोघे पती-पत्नी एकमेकांशी मजा-मस्ती करत आहेत मग त्यात वाईट काय.. तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले की, बिचारा आता आपल्या पत्नीची गंमतपण करु शकत नाही का.. तर काहीजण बॉयकॉट बॉलिवूड ही मागणी करत आहेत.