रणबीर म्हणतो तिला सोडून घरातून पाय निघत नाही...

रणबीर म्हणतो तिला सोडून घरातून पाय निघत नाही… लेकीसाठी भावूक झाला अभिनेता (Ranbir Kapoor Emotionally Talks About His Daughter Raha, Says- ‘Her Smile Breaks My Heart. I’m Always Beside Her And It’s Magical.’)

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी तू झुठी मैं मक्करच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण सोबतच तो त्याच्या अंगावर पडलेली नवी जबाबदारीही अगदी उत्तम सांभाळत आहे. काही महिन्यांपूर्वीच रणबीर आणि आलियाला मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी राहा असे ठेवले. बाप झाल्यापासून रणबीरमध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तोसुद्धा या गोष्टीचा उल्लेख करत असतो.

अशाच एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रणबीरने मुलगी राहा संबंधित अनेक भावनिक गोष्टींचा खुलासा केला. कोलकात्यातील प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीरने सांगितले की, माझी सकाळची फ्लाइट होती आणि फ्लाइटच्या आधी राहासोबत वेळ घालवण्यासाठी मला 20 मिनिटे मिळाली, जी माझ्यासाठी अमूल्य होती. मला तिच्या आसपास राहायला आवडते. मला तिची खूप आठवण येते. मी सतत तिचे फोटो बघत बसतो. जेव्हा मी घरी असतो, मी फक्त तिच्याबरोबर असतो किंवा तिच्या आजूबाजूला असतो, तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण जादुई आहे.

अभिनेत्याने आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगितली की तो ढेकर देण्यात स्पेशालिस्ट आहे.तो म्हणाला की, मला कधीच माहित नव्हते की बाळाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ढेकर हा इतका महत्वाचा भाग असतो. गेल्या दोन आठवड्यांत ती हसायला शिकली आहे आणि तिचे हसणे पाहून माझे मन विरघळते. तिला सोडून घराबाहेर पडावंसं वाटत नाही. तुम्ही मला प्रेमाच्या भाषेबद्दल विचारत होता, पण बाळाच्या प्रेमाला भाषा नसते. हे फक्त प्रेम आहे जे मी स्पष्ट करू शकत नाही. प्रेमाचा हा एक वेगळा आणि नवीन अनुभव आहे ज्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. वडील होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि आनंदाची भावना आहे.

दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले.

तू झुठी मैं मक्कर बद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट 8 मार्च असून यात रणबीरसोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे. याशिवाय रणबीरचा अॅनिमल हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.