भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध...
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत (Ranbir Kapoor Do Lead Role Sourav Ganguly biopic After ‘Sanju’, shooting is going to start soon)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या खूप चर्चेत आहे. तो त्याच्या ‘तू झुठी है मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता वाढत आहे. शिवाय हा चित्रपट त्याच्या शीर्षकामुळे देखील खूप चर्चेत आहे. पण रणबीर कपूर सध्या ‘तू झुठी है मक्कार’ व्यतिरिक्त आणखी एका चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या नव्या चित्रपटाशी रणबीर कपूरचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. हा चित्रपट बायोपिक असून लवकरच त्याचे शुटिंग सुरू होणार आहे.

भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावरील हा चित्रपट असून या चित्रपटाशी रणबीर कपूरचे नाव बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाबाबत आत्तापर्यंत अनेक अपडेट्स आले आहेत. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाच्या काही तारखाही काढण्यात आल्या आहेत. या वृत्तात पुढे सांगण्यात आले की, या चित्रपटाचे शूटिंग कोलकाता येथे लवकरच सुरू होणार आहे. लव रंजनने यासाठी तयारी सुरू केली आहे. रणबीर कपूरने यापूर्वी संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’मध्ये काम केले होते, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

दरम्यान रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘तू झुठी है मक्कार’ हा चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिट व्हावा यासाठी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मेहनत घेत आहेत. नुकताच श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत होते.