आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दादा...

आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाल्यावर रणबीर कपूरने केले आपल्या पत्नीचे कौतुक (Ranbir Kapoor Calls Alia Bhatt ‘Truly Deserving’ Of Dadasaheb Phalke Award, Doesn’t Feel He Deserves It, Watch VIDEO)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने पत्नी आलिया भट्ट आणि स्वतःला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आनंद व्यक्त करताना अभिनेत्याने सांगितले की, आलिया या पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र आहे. पण मी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी पात्र आहे असे मला वाटत नाही.

अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि तिचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

सध्या रणबीर कपूर त्याच्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच रणबीर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेला होता. कार्यक्रमादरम्यान, जेव्हा तेथे उपस्थित असलेल्या माध्यमकर्मीयांनी रणबीर कपूरला पत्नी आलियाला आणि त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल विचारले तेव्हा त्याने  दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मागितले.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आपल्या पत्नीचे कौतुक करताना अभिनेता असेही म्हणाला- “खरं तर आलिया या पुरस्कारासाठी पात्र आहे. पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी मी पूर्णपणे पात्र आहे असे मला वाटत नाही. पण जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो तेव्हा तुमच्या पाठीवर थाप पडते की तुम्ही चांगले काम केले आहे.”

अभिनेता रणबीर कपूरचा आगामी चित्रपट तू झुठी मैं मकर लवकरच प्रदर्शित होणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंग बस्सी, मोनिका चौधरी, हसलीन कौर, राजेश जैस, आयशा रझा मिश्रा आणि इतर अनेक कलाकार आहेत.