प्रेमरंगी रंगलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor And...

प्रेमरंगी रंगलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor And His Love Affairs; Ranbir Dated These Bollywood Actresses)

चॉकलेट बॉय म्हणून नाव कमावलेल्या रणबीर कपूरच्या प्रेमकहाण्या फारच मशहूर झाल्या आहेत. त्याने बॉलिवूडच्या काही हिरॉईन्स बरोबर प्रेमाची गोडी चाखली आहे. प्रत्यक्ष जीवनात त्याने किती जणींशी प्रेम केले असेल, ते त्यालाच ठाऊक. पण बॉलिवूडमध्ये त्याची अफेअर्स या हिरॉईन्सशी होती.

सोनम कपूर

सोनमने संजय लीला भन्साली यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचा नायक रणबीर कपूर होता. ही जोडी पडद्यावर जमत होती, अन्‌ पडद्यामागे त्यांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा रंगात आली होती. रणबीरचे हे पहिले प्रेमप्रकरण मानले जाते. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात खुद्द सोनम कपूरने या प्रेमप्रकरणाची कबुली दिली होती. पुढे मात्र दीपिका त्याच्या जीवनात आली आणि त्याने सोनमला डच्चू दिला.


दीपिका पादुकोण

रणबीर व दीपिका यांचं प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. दीपिका त्याच्या प्रेमात इतकी दिवानी झाली होती की, तिने आपल्या अंगावर त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. नंतर आपल्या भ्रमरी वृत्तीनुसार रणबीरचं प्रेम कतरिना कैफवर जडलं, अन्‌ त्यानं दीपिकाला निरोप दिला. या प्रेमभंगातून सावरायला दीपिकाला बराच वेळ लागला होता.


कतरिना कैफ

या कतरिनासाठी रणबीरने दीपिकाला निरोप दिला. मग हे दोघे लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण यांचं लवकरच बिनसलं. हे दोघे बहुधा लग्न करतील, अशा बातम्या तेव्हा मिळत होत्या. पण तसं काही न घडता, दोघेही वेगळे झाले.


नरगिस फाखरी

‘रॉकस्टार’ या चित्रपटाचे शूटिंग चालू असताना रणबीर आणि नरगिसचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा अगदी रंगात आल्या होत्या. पण चित्रपट प्रदर्शित होताच या रंगाचा भंग झाला. दोघांचा ब्रेकअप झाला.


प्रियंका चोप्रा

‘अनजाना अनजानी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि प्रियंका चोप्राचे प्रेम रंगात आले. या प्रेमरंगाच्या बातम्या मिडियामध्ये प्रसिद्ध पावल्या. पण लवकरच त्यांचा ब्रेकअप झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकमेकांपासून अलग झाले तरी रणबीर आणि प्रियंका चांगले मित्र म्हणून बनून राहिले.


अवंतिका मलिक

‘जस्ट मोहब्बत’ या टी.व्ही. मालिकेतून अवंतिका मलिक या क्षेत्रात आली. ती बालकलाकार होती. तारुण्यात पर्दापण करताच तिचं रणबीर कपूरशी प्रेम जुळलं. पुढे दोघे वेगळे झाले. अन्‌ अवंतिकाने आमिर खानचा भाचा इमरान खानशी लग्न केले.


आलिया भट्ट

रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या प्रेमाचे चाळे बऱ्याच दिवसापासून चालू आहेत. दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी आहे. आजकाल ते सतत एकत्र दिसतात. या प्रकरणात रणबीर गंभीर असल्याचे दिसते.
सांगायला हरकत नाही, पण जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही, अमिषा पटेल या अभिनेत्रींसोबत पण रणबीरचे नाव जोडले गेले होते. शिवाय पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान देखील त्या यादीत होती. रणबीरच्या प्रेमकहाण्या कायमच चर्चेत होत्या. पण आलिया भट्टशी त्याचे जे प्रेमकूजन चालले, त्याबाबत तो सिरियस दिसतो आहे. दोघांचे चाहते पण त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)