रणबीर-आलिया यांच्या लग्नाची नवीन तारीख… य...

रणबीर-आलिया यांच्या लग्नाची नवीन तारीख… याच वर्षी एप्रिलमध्ये वाजणार सनई-चौघडे (Ranbir Kapoor and Alia Bhatt to get married soon, couple to tie the knot in April this year)

कतरीना – विकी कौशल यांच्या लग्नानंतर बी टाउनला आता बॉलिवूडचे अतिशय लाडके लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची उत्सुकता आहे. आपल्या या आवडत्या जोडीला नवरा-नवरी बनलेले पाहण्यासाठी चाहते आतुरले आहेत. दोघं कधी लग्न करताहेत, असं त्यांना झालं आहे. पण चाहत्यांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाहीये. कारण मिळालेल्या माहितीनुसार लवकरच दोघांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजणार आहेत. दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीस सुरुवातही केली आहे.

रणबीर-आलिया गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यापासून चाहते त्यांच्या लग्नाच्या दिवसाची वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण अगदी पुढच्याच महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात हे लव्हबर्ड्‌स लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

याआधीही अनेकदा त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली गेली, या वर्षी ऑक्टोबर वा डिसेंबर महिन्यात दोघं लग्न करतील असं म्हटलं गेलं होतं. परंतु, आता त्यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांकडून बातमी मिळाली आहे की ते एप्रिलमध्ये लग्न करण्याचे ठरवत आहेत.

दोघांच्या घरी लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. अलीकडेच नीतू कपूर यांना मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये पाहण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त मनीष मल्होत्रालाही त्यांच्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. तेव्हा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीला खरोखरच सुरुवात झाली आहे, यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

रिपोर्ट्सनुसार, रणबीर-आलिया यांनी त्यांच्या या खास दिवसासाठी त्यांच्या मेकर्सकडे एप्रिलमधल्याच फ्री डेट्सची मागणी केली आहे. दोघांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी लवकरच लग्नाची तारीख जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये लग्न करणार होते. रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर कोविड आला नसता तर त्यांनी लग्न केले असते. नुकतेच आलिया भट्टलाही लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तिने रणबीरशी मनापासून लग्न केले आहे. बाकी सर्व काही योग्य वेळ आल्यावर होईल.