रणबीर कपूर आणि आलिया भट्टने राहाचे फोटो न काढण्...

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने राहाचे फोटो न काढण्याची मिडियाला केली विनंती, सोबतच मिडियावाल्यांना खास ट्रीट देत आलियाने सगळ्यांची मनं जिंकली (Ranbir Kapoor and Alia Bhatt request paparazzi not to click Raha’s photos, See Viral Video)

बॉलिवूड दिवा आलिया भट्टने नेहमीच आपल्या वागण्यातून ती खऱ्या अर्थाने बॉलिवूडची ‘स्वीटहार्ट’ आहे, ही गोष्ट सिद्ध केली आहे. अलिकडेच, अभिनेत्रीने मिडियासाठी एक खास गेट-टूगेदर आयोजित केले होते. या गेट-टूगेदरमध्ये या जोडप्याने मिडियाला विनंती केली आहे की, त्यांनी राहाचे फोटो काढू नयेत. याचवेळी उभयतांनी मीडिया कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रीट देत राहाचे काही फोटोही दाखवले.

बॉलिवूड स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मीडियासाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये, जोडप्याने मिडियाला विनंती केली की, त्यांची मुलगी राहा ही अवघी  २ महिन्यांची असल्याने तिचे फोटो क्लिक करू नका. एवढेच नाही तर रणबीर आणि आलियाने पापाराझींना राहाबाबत गोपनीयता राखण्याची विनंतीही केली.

६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना मुलगी झाली. आता ती २   महिन्यांची आहे. याच अनुषंगाने रणबीर आणि आलियाने मीडियासाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे व्हिडिओ पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पापाराझींना विनंती केल्यानंतर आलियाने त्यांना ट्रीट दिली. आलियाने हात जोडून तेथे उपस्थित सर्व मीडिया कर्मचाऱ्यांना कृपया, कार्यक्रम सोडण्यापूर्वी काहीतरी खा असं सांगून राहाचे फोटो प्रसिद्ध करू नका अशी विनंती केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आलिया भट्टने कमेंटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी स्टार जोडप्याचे, त्यांच्या वागण्याचे कौतुक केले आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सने हार्ट आणि हार्ट आय इमोजी तयार केले आहेत.