विवाह स्थळ ठरविण्यासाठी रणबीर कपूर-आलिया भट्टचा...
विवाह स्थळ ठरविण्यासाठी रणबीर कपूर-आलिया भट्टचा जोधपूर दौरा : मुहूर्त ठरला की काय? (Ranbir Kapoor And Alia Bhatt Reach Jodhpur For Scouting Wedding Venue, They Are Planning To Tie The Knot Soon)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट खूप दिवसांपासून डेटिंग करत आहेत. त्यांचं लग्न कधी होणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. दरम्यान ही जोडी जोधपूरला गेली असल्याची खबर मिळाली. अन् जे फोटो प्रसिद्ध झाले, त्यावरून हे दोघे लवकरच लग्नगाठ बांधण्याच्या विचारात दिसत आहेत. जणू विवाह स्थळ ठरवायला जोधपूरला गेले असावेत, अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले रणबीर-आलियाचे फोटो जोधपूर विमानतळावरील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही जोडी चार्टर विमानाने जोधपूरला पोहचले होते.
या फोटोंमुळे त्यांच्या लग्नाची तारीख ठरलीय् की काय, या चर्चेला उधाण आलं आहे.

या संदर्भात एवढंच सांगता येईल की, यापूर्वी या दोघांच्या लग्नावरून बरेचदा वावड्या उठल्या आहेत. त्यांची बनावट लग्नपत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. गेल्या वर्षी हे दोघे कुटुंबियांसह, नवीन वर्षाचे स्वागत करायला रणथंभोरला गेले होते, तेव्हा तर त्यांचा साखरपुडा झाला असल्याची आवई उठली होती.

रणबीर-आलिया गेल्या तीन वर्षांपासून डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाची सगळेच लोक वाट पाहत आहेत. करोनाच्या साथीमुळे लग्न पुढे ढकलले गेले आहे.
या दोघांच्या जोधपूर भेटीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण २८ सप्टेंबरला रणबीरचा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी हे दांपत्य तिथे गेले असावे, अशी शक्यता आहे.