आलिया आणि रणबीरने लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण क...

आलिया आणि रणबीरने लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण केला साजरा (Ranbir Kapoor And Alia Bhatt Celebrate First Diwali Post Marriage With Neetu Kapoor, See Photos)

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नीतू सिंहने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या  फोटोंमध्ये, नीतूने आपल्या मुलाच्या व सूनेच्या पहिल्या दिवाळी सणाची झलक दाखवली आहे.

बॉलिवूडचे पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये या जोडप्याने लग्न केले आणि लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच म्हणजेच जूनमध्ये त्यांनी सोशल मीडियावर ते आईबाबा होणार असल्याची  बातमी शेअर केली. बाळाच्या आगमनापूर्वी आणि लग्नानंतर रणबीर आणि आलिया आपली पहिली दिवाळी साजरी करत आहेत.

रणबीर आणि आलिया यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली. यानिमित्ताने रणबीर कपूरची आई नीतूने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या नीतू कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर आनंदी कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नीतूसोबत रणबीर, आलिया, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट दिसत आहेत.

या फोटोमध्ये रणबीरने सोनेरी एम्ब्रॉयडरी असलेला काळा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. आलिया भट्ट गुलाबी रंगाच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहे. फोटोत आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्ट दिसते. रणबीरने एक सेल्फी क्लिक केला आहे. हा सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत नीतूने कॅप्शन , ‘दिवाळीच्या शुभेच्छा असे लिहिले आहे.

नीतूच्या या फोटोवर त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनीने रेड हार्ट इमोजीने कमेंट केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोवर एका चाहत्याने कमेंटमध्ये अभिनंदन सासूबाई.. सूनेची पहिली दिवाळी असे लिहिले आहे तर दुसऱ्या युजरने परफेक्ट फॅमिली फोटो, हॅपी दिवाळी असे लिहिले आहे.