रणबीर-आलिया १७ एप्रिलला करणार लग्न ! १३ एप्रिलप...

रणबीर-आलिया १७ एप्रिलला करणार लग्न ! १३ एप्रिलपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांची सुरुवात, निमंत्रकांची यादी झाली तयार (Ranbir-Alia To Tie The Knot On 17th April, Wedding Festivities To Begin From 13th, Guestlist Out)

रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचं लग्न हे सध्या बॉलिवूडमधला सर्वात चर्चेत असलेला इव्हेंट आहे. या दोघांचं लग्न पाहण्यासाठी सर्वजण आतुरले आहेत. कारण अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. एप्रिलच्या १७ तारखेला दोघं लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची बातमी आहे. आलियाचे आजोबा आजारी असल्यानं पक्की अशी लग्नाची तारीख समोर येत नाहीये. पण १३ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान लग्न लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कपूर कुटुंबाच्या पारंपरिक आरके हाऊसमध्ये जिथे ऋषी कपूर आणि नितू कपूर यांचं लग्न लागलं होतं, तिथेच हे लग्न होईल.

१३-१४ एप्रिलपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिलपासून लग्नाआधीच्या मेंदी, हळद आणि संगीत अशा कार्यक्रमांना सुरूवात होईल, ज्यामध्ये दोघांचे कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार तसेच इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटी उपस्थित राहतील. दोघांच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू असून प्री-वेडिंग फंक्शनपासून वेडिंग आउटफिटपर्यंतच्या कामांना वेग आला आहे.

लग्न पंजाबी रितीरिवाजांनुसार

रणबीर आलियाचे लग्नाचे सर्व विधी पंजाबी रितीरिवाजांनुसार पार पडणार आहेत. कपूर घराण्याचा प्रत्येक सोहळा अप्रतिम असतो, त्यामुळे लग्न किती धुमधडाक्यात असेल याचा अंदाज लावता येईल.

आर के हाऊसमध्ये लागणार लग्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार नाही. तर या दोघांचं लग्न मुंबईतच होणार आहे. आलिया-रणबीरचं लग्न एन्सेस्ट्रल हाऊस आरके हाऊसमध्ये होणार आहे. दोघांचं लग्न अत्यंत खासगी पद्धतीनं होणार असून त्यात मौजक्या व जवळच्या लोकांनाच निमंत्रित केलं जाणार आहे. पाहुण्यांच्या या यादीत शाहरुख खान, करण जोहर, संजय लीला भंसाळी, झोया अख्तर यांना आमंत्रण आहेच. शिवाय वरुण धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन, अयान मुखर्जी, डिझायनर मसाबा गुप्ता, अर्जुन कपूर, आकांक्षा रंजन, अनुष्का रंजन, मनीष मल्होत्रा यांनाही आमंत्रण मिळालं आहे.

लग्नानंतर भव्य रिसेप्शन

रिपोर्टनुसार, लग्नानंतर रणबीर-आलिया त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसाठी ग्रँड रिसेप्शनची योजना आखत आहेत, ज्यासाठी शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे वेडिंग रिसेप्शन स्टार स्टेड अफेअर असणार आहे.

लग्नापूर्वी बॅचलर पार्टी देणार

सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नाआधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी आणि इंडस्ट्रीतील लोकांसाठी एक भव्य बॅचलर पार्टी देणार आहेत, ज्यामध्ये अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांचा समावेश असू शकतो.

रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र येत्या ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्याचं प्रमोशनल इव्हेंट काही महिन्यांनी सुरू होईलच. लग्न झाल्यानंतर दोघंही आपापल्या शूटिंगमध्ये बिझी असतील.