आलिया दिसली नाही तर रणबीर कपूर बाथरुमला सुद्धा ...

आलिया दिसली नाही तर रणबीर कपूर बाथरुमला सुद्धा जात नाही: इतका तिच्यावर अवलंबून आहे ( Ranbeer Kapoor Is So Much Dependent On Alia; Does Not Go To Bathroom If She Is Not Seen Around)

एप्रिल महिन्यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी त्यांनी ते आईबाबा होणार असल्याची बातमी सर्वांना कळवली. आलियाशी लग्न झाल्यापासून रणबीरचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. रणबीरच्या मते आलियाशिवाय त्याचे आयुष्य अधुरे आहे. त्याला आलियाची इतकी सवय झाली आहे की आता त्याला आपली दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा आलियावर निर्भर राहावे लागते. रणबीरला आलिया दिसली नाही तर तो बाथरुमला सुद्धा जात नाही किंवा जेवत देखील नाही. याबाबतचा खुलासा स्वत: रणबीरने नवभारत टाइम्सला मुलाखत देताना केला.

रणबीर आणि आलिया गेली पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. सध्या ते ब्रह्मास्त्र या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीरने शिवा ही भूमिका तर आलियाने इशाची भूमिका साकारली आहे. मुलाखतीत रणबीरने आलियाशी लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले.

रणबीर म्हणाला की, मी खूप आव आणतो की मी कोणावर अवलंबून नाही. पण मी आलियावर खूप अवलंबून आहे. आलिया आसपास नसेल तर मी बाथरुमला सुद्धा जात नाही किंवा जेवतसुद्धा नाही. आलिया माझ्याजवळ असणे खूप महत्वाचे आहे. मग तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो नाही किंवा एकमेकांशी रोमॅण्टिक गोष्टी केल्या नाहीत तरी ती मला माझ्या शेजारी दिसायला हवी. तेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.

ब्रह्मास्त्रमध्ये जसे शिवा आणि ईशा एकमेकांशिवाय अधुरे आहेत तसेच मी आलियाशिवाय अधुरा आहे असे रणबीर म्हणाला. रणबीरने पुढे सांगितले की, शिवा आणि ईशा ही चित्रपटातील पात्र आहेत. प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्यातसुद्धा काही चांगले तर काही वाईट दिवस असतात. पण आम्ही एकमेकांसाठी सर्वोत्तम देण्याच्या सतत प्रयत्नात असतो. आमची रिलेशनशिप खूप रोमॅण्टिक आहे किंवा आम्ही खूपच प्रेमात आहोत असे नाही. प्रेम तर सर्वचजण करतात. पण हा एक संघर्ष आहे. रिलेशनशिप खडतर असतात. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.