रामायणातील सीता दीपा चिखलीया हिचा नवा अवतार (Ra...

रामायणातील सीता दीपा चिखलीया हिचा नवा अवतार (Ramayan Actress Dipika Chikhlia, In New Avatar)

एकेकाळी अतिशय गाजलेल्या आणि गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात पुर्नप्रक्षेपणात देखील लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या ‘रामायण’ या मालिकेतील सीता अर्थात दीपिका चिखलीया पुन्हा प्रकाशात येत आहे. ती रामायणकर्ते सागर प्रॉडक्शन्स्‌च्या नव्या मालिकेत नवा अवतार धारण करून येत आहे.

सीतेची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीबद्दल दर्शकांना खूपच उत्सुकता होती. ती पुन्हा छोट्या पडद्यावर दिसावी, अशी त्यांची अपेक्षा होती.

दर्शकांची ही अपेक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. दीपिका पुन्हा येत असून, ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

दीपिकाने या संदर्भात सोशल मीडियावर जे फोटो टाकले आहेत, त्यामध्ये ती एका पौराणिक पात्राच्या अवतारात दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना हा अवतार बघून सीतेचे रूप आठवले. कारण सीतेच्या भूमिकेत ती रातोरात स्टार बनली होती.

सागर प्रॉडक्शन्स्‌ निर्मित ही मालिका पौराणिक असून दीपिकाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यातून लक्षात येते की, तो ‘जय मां वैष्णोदेवी’ या वेब सिरिजच्या शूटिंगचा आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका सुंदर दिसते आहे.

सर्व फोटोंचे सौजन्य – इन्स्टाग्राम