रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्राचे, लाल भड...

रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्राचे, लाल भडक बिकिनी घालून रस्त्यावर बेताल वर्तन : चाहत्यांची तीव्र नाराजी (Ramanand Sagar’s Great Grand Daughter Sakshi Chopra Publicly Flaunts Red Hot Bikini Looks : Gets Brutally Trolled)

‘रामायण’ या महामालिकेचे लेखक – निर्माता – दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती, साक्षी चोप्रा आता मुंबईत आली आहे. या तरुणीने लालभडक बिकिनी टॉप घालून मुंबईच्या रस्त्यावर पदार्पण केले. ते पाहून लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

साक्षी चोप्रा ही रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांची नातं असून चित्रपट निर्माती मीनाक्षी सागर यांची मुलगी आहे. आपले टॉपलेस किंवा बिकीनीतील मादक फोटो इन्स्टाग्राम वर अधून मधून शेअर करून चर्चेत राहणे, हा तिचा आवडता छंद  आहे.

लॉस एंजलस, कॅलिफोर्निया इथे साक्षीचे वास्तव्य असते. सध्या ती मुंबईत आहे. इकडे साक्षी रस्त्यावर उतरली आणि तिला पाहून पापाराझींनी कॅमेरे सरसावले. ते पाहून साक्षीला चेव आला आणि तिने आपला कोट उतरवून दणादण अंगप्रदर्शन केले.

साक्षी चोप्रा परदेशात एक मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे. ती इनस्टाग्राम वर फारच लोकप्रिय आहे.
साक्षीची कारकीर्द अमेरिकेत बहरत आहे. तिनं आधी लंडन आणि नंतर कॅलिफोर्निया येथून अभिनयाचे कोर्सेस केले आहेत. ती स्वतःची टॅलेन्ट कंपनी चालवते. अन उत्कृष्ट गायिका पण आहे. तिची धिटाई आणि कामनीय बांधा यासाठी तिची तुलना काईली जेनरशी केली जाते.