रामानंद सागर यांची पणती – साक्षी चोप्राने...

रामानंद सागर यांची पणती – साक्षी चोप्राने बिकिनीमधील बेफाम फोटो टाकून इंटरनेटचे तापमान वाढवले (Ramanand Sagar’s Great Grand Daughter Sakshi Chopra Is Hot Bikini Babe, Her Bold And Glamourous Pics Set Internet On Fire)

लेखक – पत्रकार – निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांनी उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपले योगदान देऊन चित्रसृष्टी गाजवली. तसेच ‘रामायण’ या पौराणिक टी. व्ही. मालिकेची विक्रमी लोकप्रियता मिळवून इतिहास रचला. त्यांची पणती साक्षी चोप्रा आता वेगळ्याच मार्गांनी नाव कमावते आहे. तिच्या बिकिनीतील गरमागरम फोटोंनी इंटरनेटचे तापमान इतके तापवले आहे की, आपल्या पणजोबांचे नाव ती टिकवणार की त्यांच्या नावाला बट्टा लावणार, असा प्रश्न पडेल.

साक्षी चोप्रा इंटरनेटवर चांगलीच सक्रीय आहे, अन्‌ लोकप्रिय देखील. कारण ती सोशल मीडियावर आपले बिकिनीतले बेफाम फोटो प्रदर्शित करत असते.

साक्षी ही रामानंद सागर यांचे सुपुत्र मोती सागर यांची नात आणि चित्रपट निर्माती मीनाक्षी सागर यांची कन्या आहे. आपले टॉपलेस व बिकिनीतले फोटो टाकून तिनं बरेचदा प्रसिद्धी मिळवली आहे.

ती लॉस एंजल्स, कॅलिफोर्नियात राहते. तिने अमेरिकेत फिल्म आणि ॲक्टिंगचा कोर्स केला आहे. वेस्टर्न व्होकल्सची डिग्री तिच्याकडे आहे.

ट्रिनिटी स्कूल ऑफ लंडन येथून शालेय शिक्षण घेऊन साक्षीने कॅलिफोर्नियातील स्ट्रासबर्ग थिएटर ॲन्ड फिल्म इन्स्टिट्यूट मधून सिनेनिर्मितीचे धडे घेतले आहेत. परदेशात ती एक टॅलन्ट कंपनी देखील चालवते.

साक्षी उत्तम गायिका आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच ती व्यावसायिक गायिका म्हणून नावारूपास आली. नीना सिमोनचे क्लासिक हिट वरील ‘फिलींग गुड’ हा तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ होता. हा म्युझिक व्हिडिओ लोकांना आवडला होता.

साक्षीचे स्वतःचे यू – ट्यूब चॅनल असून तिचे कित्येक व्हिडिओ त्यावर हिट झाले आहेत.

साक्षीचे आजोबा मोती सागर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ”सागर परिवाराची परंपरा साक्षी एका वेगळ्या उद्दिष्टाकडे घेऊन चालली आहे. एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर सोशल मीडियाची मान्यवर कलावती म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.”

साक्षीचे बेधुंद वर्तन आणि आकर्षक फिगर यामुळे तिची तुलना काइली जेनरशी केली जात आहे.

पूजा बेदीची मुलगा अलाया फर्निचरवाला हिच्याशी साक्षीचे भांडण झाल्याने ती गेल्या वर्षी चर्चेत आली होती.

अशा अति ग्लॅमरस रूपात वावरणारी साक्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार का, असो अंदाज व्यक्त केले जात आहेत. सध्या तरी ती इंटरनेटवर गरमागरम फोटोंनी अक्षरशः आग लावते आहे.