रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंचे राम गोपाल वर्मांनी...

रणवीर सिंहच्या न्यूड फोटोंचे राम गोपाल वर्मांनी केले समर्थन, मुली करु शकतात मग मुलं का नाही ? (Ram Gopal Varma has quirky reaction to Ranveer Singh’s nude photoshoot : says – girls can do it, so why can’t boys?)

गेले काही दिवस रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुऴे इंटरनेटवरील वातावरण तापले आहे. नेहमी वेगवेगळ्या अतरंगी कपड्यांमुऴे चर्चेत राहणारा रणवीर गेले काही दिवस त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे. त्याच्या या फोटोशूटला मिश्र प्रतिक्रिया मिऴत आहेत. काहींना ते फोटोशूट सेक्सी आणि कूल वाटत आहेत तर काहींनी या फोटोंना विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर रणवीर विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची सुद्धा मागणी होत आहे.

दरम्यान चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी रणवीरच्या फोटोशूटचे समर्थन केले आहे. तसेच हे फोटोशूट म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

राम गोपाल वर्मा म्हणाले की, लैंगिक समानतेची मागणी करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. जर एखादी स्त्री तिच्या सेक्सी शरीराचे प्रदर्शन करु शकते तर मग पुरुष का नाही, पुरुषांना नेहमी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणे हा दुटप्पीपणा आहे.

पुरुषांना सुद्धा महिलांच्या बरोबरीने अधिकार असायला हवेत. आणि भारत आता त्या दिशेने वाटचाल करत आहे. रणवीर सिंह हा लैंगिक समानतेचे उदाहरण आहे. या आधी आलिया भट्ट, अर्जून कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी रणवीरच्या फोटोंचे समर्थन केलेले आहे.

तर दुसरीकडे रणवीर या फोटोंमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. महिलांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याबद्दल त्याच्या विरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. रणवीरने हे फोटोशूट एका इंटरनॅशनल मॅगझीनसाठी केले होते. या फोटोशूटमार्फत त्याने बर्ट रेनॉल्डसला श्रद्धांजली दिली होती.