मालदीवच्या सहलीस गेलेल्या रकुल प्रीत सिंहने पाठ...

मालदीवच्या सहलीस गेलेल्या रकुल प्रीत सिंहने पाठवले बिकिनीतील ग्लॅमरस् फोटो (Rakul Preet Singh Slays In Bikini As She Drops New Pictures From Her Maldives Vacation)

दिवाळीचा सण आटोपून काही कलाकार सहलीला निघाले आहेत. रकुल प्रीत सिंहने आपल्या कामातून वेळ काढून मालदीवकडे प्रयाण केलं. तिथे सहलीचा आनंद घेत असतानाचे आपले बिकिनीतील हॉट फोटो प्रकाशित केले आहेत.

रकुलने ऑरेंज बिकिनीत एक फोटो शेअर करून सुट्टी घालवायला वेळ मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानलेत. ‘थँक गॉड’ हा तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट असून या वर्षात डॉक्टरजी, अटॅक, रन वे असे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता ‘छतरीवाली’ हा तिचा नवा चित्रपट येणार आहे. शूटिंग आणि प्रमोशनमध्ये दमछाक झाल्याने तिला ब्रेक हवा होता.

रकुलच्या ऑरेंज बिकिनीतील हॉट फोटोला लोकांनी पसंती दर्शविली. त्यानंतर रकुलने मरून कलरच्या बिकिनीताल आणखी एक ग्लॅमरस्‌ फोटो प्रदर्शित केला. त्यावर तिने प्रिंटेड लॉन्ग केप घेतले आहे. या आविर्भावात ती सुंदर दिसते आहे.

अभिनेत्रीने पोझेस पण आकर्षक दिल्या आहेत. त्या लोकांना आवडत आहेत. रकुलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर आणखी काही फोटो प्रकाशित केले आहेत.