बॉलीवुड स्टार्स रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहि...

बॉलीवुड स्टार्स रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींना देतात या भेटवस्तू, बहिणींवर करतात प्रेमाचा वर्षाव (Raksha Bandhan: Bollywood stars give precious Rakhi Gifts to their sisters, share adorable bond with siblings)

आज रक्षाबंधन आहे. हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan 2022) वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा सण सर्वसामान्यांपासून खास लोकांपर्यंत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बॉलीवूड स्टार देखील त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून आपल्या बहिणीसाठी वेळ काढण्यास विसरत नाहीत आणि या दिवशी ते आपल्या बहिणीवर प्रेमाचा वर्षाव तर करतातच पण त्याचबरोबर किमती भेटवस्तूही देतात. चला रक्षाबंधनाच्या निमित्ताने जाणून घेऊया की हे बॉलिवूड स्टार त्यांच्या बहिणींना कोणत्या भेटवस्तू देतात.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)

ग्लोबल स्टार बनलेली देसी गर्ल प्रियांका चोप्रा परदेशात राहूनही प्रत्येक भारतीय सण अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा करते. ती राखीही मोठ्या थाटामाटात साजरी करते. प्रियंका फक्त तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या मनगटावर राखी बांधत नाही, तर तिच्या २० चुलत भावांनाही राखी बांधते. तिला मिळालेल्या भेटवस्तूबद्दल सांगायचे तर, गेल्या वर्षी तिचा भाऊ सिद्धार्थने प्रियांकाला राखी भेट म्हणून १० कोटींचा फ्लॅट भेट दिला होता.

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)

कार्तिक आर्यनचे बहीण कृतिका आर्यनसोबत खूप खास बॉन्डिंग आहे. त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून लक्षात येते. कार्तिक कितीही व्यस्त असला तरी बहिणीकडून राखी बांधून घ्यायला तो कधीच विसरत नाही. गेल्या वर्षीबद्दल सांगायचे तर, कार्तिकने आपल्या बहिणीला रक्षाबंधनला ७० लाखांची हिऱ्याची अंगठी भेट दिली होती. आणि या वर्षी, Maze 2 च्या सुपर यशानंतर, कार्तिकने आपल्या बहिणीसाठी नक्कीच काहीतरी खास भेट देण्याचा विचार केला असणार असे दिसते.

सलमान खान (Salman Khan)

भाईजान सलमान खान आपल्या बहिणींना किती जीव लावतो हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. बहिणींबद्दलचे त्याचे प्रेमच त्याला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींकडे ओढून आणते. सलमानचे त्याच्या दोघी बहीणी अलविरा आणि अर्पितावर खूप प्रेम आहे आणि दरवर्षी तो त्यांच्याकडून राखी बांधून घ्यायला विसरत नाही. गेल्या वर्षी सलमानने आपल्या दोन्ही बहिणींना एक एक फ्लॅट भेट म्हणून दिला होता. यावर्षीही काहीतरी स्पेशल भेट देण्याचा त्याचा विचार असणार हे नक्की.

रणवीर सिंह (Ranveer Singh)

दीपिका असो आई असो वा बहिण रणवीर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. रणवीर सिंग रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर तिला जे हवे ते तिच्या आवडीचे गिफ्ट देतो.

सैफ अली खान (Saif Ali Khan)

राखीच्या दिवशी सोहा अली खान अतिशय पारंपारिक पद्धतीने भाऊ सैफ अली खानला राखी बांधते. आणि सैफही तिला गिफ्ट द्यायला विसरत नाही. गतवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने सोहाला ३० लाख किमतीचे हिऱ्यांचे झुमके भेट म्हणून दिले होते.

इब्राहिम खान (Ibrahim Khan)

सारा अली खान प्रत्येक सणासाठी उत्सुक असते. राखीच्या दिवशी ती फक्त भाऊ इब्राहिमला राखी बांधत नाही, तर तैमूरला राखी बांधून त्याच्यावर प्रेमाचा वर्षावही करते. यावर्षीही ती झेहच्या मनगटावर राखी बांधणार आहे. राखी गिफ्टबद्दल सांगायचे तर, इब्राहिमने साराला गेल्या वर्षी एक कोटी किमतीची हिऱ्याची अंगठी भेट दिली होती.

ऋतिक रोशन (Hritik Roshan)

हृतिक रोशनचा त्याची बहीण सुनैना रोशनवर खूप जीव आहे आणि तो तिच्याबाबत अतिशय प्रोटेक्टीव आहे. दरवर्षी तो सुनैनाकडून राखी बांधून घेतो. गेल्या वर्षी राखीच्या दिवशी हृतिकने आपल्या बहिणीला ४ लाख रुपयांची हँड बॅग भेट दिली होती.