राखी सावंतचा कंगनाला आगंतुक सल्ला; तुझ्याकडे कर...

राखी सावंतचा कंगनाला आगंतुक सल्ला; तुझ्याकडे करोडो रुपये आहेत तर लोकांना ऑक्सिजन दे ना! (Rakhi Sawant’s Massege To Kangana Ranaut, ‘you have crores of rupees. You Should you Help People In Getting Oxygen)

बिग बॉसनंतर ड्रामा क्वीन राखी सावंत सतत या ना त्या कारणाने प्रकाशझोतात राहिली आहे. करोना महामारीच्या काळातही ती आपल्या वेगळ्या आणि मजेशीर अंदाजाने सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसली. ती घराबाहेर असताना, कॅमेऱ्यासमोर आली की काही ना काही गंमत करणार हे निश्चित असतं. यावेळेस या ड्रामा क्वीनने चक्क पंगा क्वीन कंगनाला सल्ला दिलाय्‌. कंगनाने देशसेवेसाठी पुढे येऊन गरजवंतांसाठी ऑक्सिजन सिलेंडर दान करावेत, असं तिनं म्हटलंय्‌.

कंगना रनौत आणि राखी सावंत या दोघी कोणत्याही विषयावर बोलण्यास अजिबात घाबरत नाही. तसेच दोघीही कोणावरही भाष्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशातच पापराजींनी करोनाच्या संदर्भात कंगनाने अलीकडे जे भाष्य केले त्यावर राखीचे मत विचारले आणि राखीने लगेचच कंगनाला लोकांची सेवा करण्याचा सल्ला देऊन टाकला.

सध्या इन्स्टाग्रामवर राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात राखीने सफेद रंगाचा लाँग टॉप घातला असून चेहऱ्यावर दोन-दोन मास्क लावलेले दिसत आहेत. कारमधून बाहेर येताच ती सगळीकडे सॅनिटायझर मारताना दिसते आहे. एवढेच नाही तर करोना आता लहान बाळ आहे, त्याचं पालनपोषण करून त्यास तरुण बनवू नका, असंही ती सांगत आहे.

”आजकाल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदीजी बरोबर आहेत का चूकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. काही काही ठिकाणी, आपल्यासाठी, देशासाठी,”  कंगनाच्या या वक्तव्यावर पापराजींनी राखीची प्रतिक्रिया विचारली. यानंतर राखी म्हणाली, ‘कंगना जी, कृपया देशाची सेवा करा. आपल्याकडे इतके कोट्यावधी रुपये आहेत. त्यातून ऑक्सिजन खरेदी करा आणि लोकांमध्ये वितरित करा, आम्ही तर हेच करत आहोत.’ आपल्याला माहीतच आहे की, यावेळी अनेक कलाकार कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

सोनू सूद रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि बेडची सोय करून देत आहे. अजय देवगणही मुंबई महानगरपालिकेसोबत एकत्र येऊन कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्याचे काम करत आहे. याव्यतिरिक्त सुनिल शेट्टी, सलमान खान, अक्षय कुमार अशा अनेक कलाकारांनी कोविड रुग्णांसाठी जमेल तशी मदत केलेली आहे. परंतु कंगनाने अशी एखादी मदत केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा कंगनाने देशाच्या परिस्थितीबाबत हळहळ व्यक्त करण्याऐवजी राखीची सल्ला ऐकण्यास काहीच हरकत नाही.