राखी सावंतचा नवरा रितेशला त्याची मूळ बायको कोंड...

राखी सावंतचा नवरा रितेशला त्याची मूळ बायको कोंडीत पकडू पाहतेय्… कारण काय? (Rakhi Sawant’s Husband Ritesh’s Wife Snigdha Priya To File Case Against Him… Know Why)

बिग बॉस १५ या कार्यक्रमातील स्पर्धक व राखी सावंतचा (Rakhi Sawant) नवरा, रितेश सिंह (Ritesh) चांगलाच अडचणीत येतो आहे. कारण त्याची मूळ बायको स्निग्धा प्रिया, त्याचा जामीन रद्द करण्याच्या खटपटीत आहे. तसेच एका महिलेचे शील भंग करण्याचा दावा त्याच्यावर ठोकून त्याला कोंडीत पकडते आहे. ती म्हणते की, बिग बॉसच्या घरात, रितेशनी राखीशी जे वर्तन केले आहे, त्याची मला लाज वाटते आहे. ई टाइम्स टी. व्ही. ला दिलेल्या मुलाखतीत स्निग्धा म्हणते, “त्याने माझे नाव माझ्या भाच्याशी जोडले, ते असह्य आहे. मी त्याच्यावर लवकरच कारवाई करणार…”

Rakhi Sawant's Husband

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या आधी रितेशने, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर इ टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आधीच्या बायकोवर काही आरोप लावले होते. “एका माणसाबरोबर ती दोनदा पळून गेली होती. मी राखीशी कायद्याने लग्न केलेले नसून २०२२ साली करीन,” असे रितेशने त्यामध्ये सांगितले होते.

Rakhi Sawant's Husband

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याच चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्निग्धाने सांगितले की, “मी रितेशची कायदेशीर बायको असून मला ६ वर्षांचा मुलगा आहे. ही बाब रितेशने लपवून ठेवली असून राखी व त्याच्यात जे काही घडलं आहे, ते बेकायदेशीर आहे. आमच्यात भांडण झालं नि तो मला सोडून गेला.”

Rakhi Sawant's Husband
Rakhi Sawant's Husband

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या आधी देखील स्निग्धाने, रितेशबाबत काही धक्का देणारे खुलासे केले होते. २०१७ साली क्षुल्लक कारणावरून रितेशने मला रक्त येईस्तोवर मारहाण केली होती. या दोघांचे लग्न २०१४ साली बिहार राज्यातील बेतिया जिल्ह्यात झाले. रितेशचा अमेरिका किंवा यु.के. मध्ये कोणताही व्यवसाय नसून तो बेतियाचा निवासी आहे. असे स्निग्धाने केलेले खुलासे होते.