राखी सावंतची भन्नाट योगासने...

राखी सावंतची भन्नाट योगासने (Rakhi Sawant’s Glamorous Yoga Practice)

काही दिवसांपूर्वी राखी सावंतने, जवळपास नग्न वाटेल, असे तंग, स्कीन कलरचे ड्रेस घालून, योगा करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. सदैव काही ना काही निमित्ताने प्रसिद्धी पावण्याचा छंद असलेल्या राखी सावंतची ती कृती होती, अशी टीका तिच्यावर झाली. हे खरं मानलं तरी राखी सावंत योगा प्रेमी आहे, हे विसरून चालणार नाही. राखी योगाभ्यास करते आणि आपला फिटनेस राखते हे, तितकंच सत्य आहे.

काही वर्षांपूर्वी राखीने असेच आपले योगासने करीत असलेले फोटो प्रसिद्धीस दिले होते. त्यामध्ये तिच्यासोबत अर्शी खान दिसत आहे. हे फोटो पाहता, राखी सावंतने योगासने केली असली, तरी त्यासाठी जो ड्रेस घातला आहे, तो चांगलाच अंगप्रदर्शन करणारा आहे. योगासनांच्या या क्रियेत राखीने बिनधास्त अंगप्रदर्शन केलेले आहे.

अंगप्रदर्शनाचा हा मुद्दा बाजूला ठेवला तरी, आपली ही भन्नाट योगासने करताना राखीने तेव्हा चांगला संदेश सर्व लोकांना दिलेला आहे. राखीचा हा योगाभ्यास जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रकाशित झाला होता. आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने राखीचे ते फोटो आणि तिचा गंभीर संदेश आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

राखी सावंत म्हणते, ”योग ही केवळ शारीरिक कसरत नसून तो आध्यात्मिक मार्ग आहे. म्हणून आपण तो दररोज अंगिकारला पाहिजे. आपल्या दिवसाची सुरुवात योगाच्या सरावाने करायला पाहिजे.”

राखी पुढे म्हणते, ”कामाच्या धबडग्यात वेळ मिळत नसेल तर फक्त ५ मिनिटे का होईना पण योगाचा सराव ठेवा, अगदी दररोज. या साध्या, सोप्या योगाने तुमच्या जीवनातील समस्या, संघर्ष यातून तुम्हाला मार्ग सापडेल. अन्‌ मनातील गोँधळ दूर होऊन तुम्ही आनंदी राहाल.”