गरोदर होती पण मी माझे बाळ गमावले, राखी सावंतने ...

गरोदर होती पण मी माझे बाळ गमावले, राखी सावंतने केला खळबळजनक खुलासा (Rakhi Sawant was pregnant, suffered a miscarriage, Actress reveals shocking details ‘Everyone thought it was a joke’)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या आयुष्यात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. आपल्या वागण्या-बोलण्यातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या राखीने आदिल दुर्राणीसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची घोषणा केली. तेव्हापासूनच तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर बरीच नाचक्की सुरू आहे. आधी आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला, नंतर बऱ्याच नाट्यानंतर आदिलने लग्नाची बाब मान्य केली. यानंतर राखी सावंत प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली होती, मात्र राखी यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण आता पहिल्यांदाच राखीने गरोदरपणाच्या बातमीवर मौन तोडले असून आपला गर्भपात झाल्याचे सांगितले आहे.

प्रसिद्ध पापाराझीने दिलेल्या माहितीनुसार राखीने त्याच्याशी फोनवर बोलताना गरोदर असल्याचं सत्य स्वीकारलं आहे. पापाराझीशी फोनवर बोलताना राखी म्हणाली, “हो भाऊ, मी गरोदर होते. मी बिग बॉस मराठीमध्ये माझ्या गरोदरपणाची घोषणा देखील केली होती, परंतु लोकांना वाटले की मी विनोद करत आहे. ही बाब कोणी गांभीर्याने घेतली नाही. यावेळी राखी सावंतनेही गर्भपात झाल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की मी माझे मूल गमावले आहे.

राखी सावंतने ७ महिन्यांपूर्वी आदिल खान दुर्राणीशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने आपलं नाव बदलून फातिमा असंही ठेवलं, पण तिने आपल्या लग्नाची गोष्ट मीडियापासून लपवून ठेवली. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलची इच्छा होती की त्यांच्या लग्नाचे प्रकरण गुप्त ठेवावे. मात्र जेव्हा राखीला आदिल आपली फसवणूक करत असल्याचे जाणवले तेव्हा तिने फोटो शेअर करून लग्नाची घोषणा करून खळबळ उडवून दिली.

लग्नाची घोषणा झाल्यापासून राखी सावंतच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र त्यानंतर राखीने गरोदरपणावर काहीही बोलण्यास नकार दिला. जरी ती सिंगल मदर झाली तरी ती आदिलवर प्रेम करेल असे तिने सांगितले. शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यावर प्रेम करणार असंही राखी म्हणाली.