राखी सावंतचा जवळपास नग्न वाटणारा योगा करतानाचा ...

राखी सावंतचा जवळपास नग्न वाटणारा योगा करतानाचा व्हिडिओ पाहून ट्रोलर्सचा भडिमार (Rakhi Sawant Trolled For Sharing Nude Looking Yoga Video)

सदैव जगावेगळी कृती करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतने आणखी एक वादळी कृती केली आहे. योगा करतानाचा आपला व्हिडिओ, सोशल मीडियावर शेअर करून वादळ निर्माण केले आहे. कारण या व्हिडिओत ती जवळपास नग्न दिसते आहे.

आपला फिटनेस राखण्यासाठी व वाढलेले वजन कमी करण्यासाठी राखी सावंतने प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास आणि व्यायामास सुरुवात केली आहे. अन्‌ त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली आहे.

राखी सावंतने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत ती जवळपास नग्न दिसते आहे. कारण तिने त्वचेच्या रंगाची स्पोर्टस्‌ ब्रा आणि शॉर्टस्‌ घातले आहेत. बेज कलरचे हे कपडे घातल्याने तिने हे कपडे घातलेच नसावेत, असा आभास निर्माण होत आहे. मात्र तिचे हे कपडे पाहून ट्रोलर्सनी राखीवर कमेंट्‌सचा भडिमार केला आहे. काहींनी तिच्या योगाभ्यासाचे कौतुक केले आहे तर, काहींनी तू नेकेड आहेस का? असा प्रश्न विचारला आहे. योगा करताना हे शोभत नाही, असंही कोणी म्हटलं आहे.

All Photo credits : Instagram

मात्र राखीची मैत्रिण सोफिया हयात हिने ‘स्ट्राँग’ असे तिला म्हटले तर कविता कौशिकने ‘स्ट्राँगेस्ट गर्ल’ असे तिचे कौतुक केले आहे.
अलिकडे राखी सावंत बिग बॉस १४ मध्ये दिसली होती, तर आता इंडियन आयडॉल १२ मध्ये दिसणार आहे.