आठवडा अखेरीस मिका सिंगला बघून राखी सावंतला बसल...

आठवडा अखेरीस मिका सिंगला बघून राखी सावंतला बसला झटका : सलमान तिला चिडवत म्हणाला – बघ, तुझा फेवरेट आला! (Rakhi Sawant Shocked To See Mika Singh On Weekend Ka Vaar : Salman Khan Teases – Your Favourite Is Here)

बिग बॉस कार्यक्रमात विकएंड वर मध्ये पाहुणे येत – जात असतात. पण या खेपेला सलमान सोबत येणार आहेत मिथुन दा आणि मिका सिंग. सलमान आणि मिथुन दा यांनी खूप मौज मस्ती केली.

पण या शो च्या प्रोमोमध्ये मिथुन सह भरती सिंह आणि हर्ष येणार आहेत. अन मिका सिंगची जेव्हा घरवाल्यांशी ओळख करून देण्यांत आली, तेव्हा राखी सावंतला बराच मोठा झटका लागलेला दिसला. सलमान खान तिला चिडवत म्हणाला बघ राखी, तुझा फेवरेट आला आहे.

राखीला मिका विचारतो, ‘हाय राखी, कशी आहेस!’ पण त्याला बघून राखीला धक्का बसला आहे. बहुधा तिला जुना प्रसंग आठवला असावा. जेव्हा मिकाने तिचा आपल्या वाढदिवशी किस घेतला होता. तेव्हा राखीने त्याच्या विरुद्ध फिर्याद गुदरली होती. मिकाने आपला जबरदस्तीने किस घेतला, असा आरोप राखीने लावला आणि मोठा हंगामा केला होता. नंतर हे प्रकरण मिटलं. पण आजही मिका व राखीला बघितलं तर २००६ साली घडलेला प्रसंग आठवतो.