राखी सावंतच्या जीवनाची परवड; उष्टं अन्न चिवडून ...

राखी सावंतच्या जीवनाची परवड; उष्टं अन्न चिवडून खाण्याची वेळ आली होती…(Rakhi Sawant Shares Unseen Childhood Photos, Says ‘I have Seen Ups & Downs In Life.’)

रुपेरी पडद्यापेक्षा, पडद्यामागे कायमच वादग्रस्त राहिलेली राखी सावंत कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हटली जाते. आता मात्र तिने वादाच्या ऐवजी करुणा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर आपले लहानपणीचे फोटो टाकले आहेत. त्यामध्ये ती अतिशय गोड दिसते. या फोटोंच्या माध्यमातून तिने जीवनातील संघर्ष कथा वर्णन केली आहे. तिनं लिहिलं आहे की, मी जीवनात असंख्य चढ-उतार बघितले आहेत. आपल्या लहानपणीच्या फोटोंवर कमेंट करण्याची मागणी तिने चाहत्यांकडे केली आहे.

चाहत्यांनी तिला चांगलाच प्रतिसाद दिला आहे नि प्रेम व्यक्त केले आहे. आपल्या जीवन संघर्षाबाबत राखीने एका मुलाखतीत सांगितलं की, आपण अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलो. घरात महिलांवर खूप बंधनं होती. ते लोक चाळीत राहत होते. घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, तिला रोजंदारीवर काम करावे लागत होते. ५० रुपये रोज तिला मिळत होते. बिग बॉस शोमध्ये तिनं सांगितलं होतं की, टीना अंबानीच्या लग्नात तिनं वाढप्याचं काम केलं होतं. ज्याचा तिला ५० रुपये मोबदला मिळाला होता.

त्यांना पोटभर जेवायलाही तेव्हा मिळत नव्हतं. शेजाऱ्यांचं उष्टं अन्न नाइलाजानं खावं लागायचं. शेजारी अन्न टाकून द्यायचे, ते उचलून मी खायची. राखीचं खरं नाव नीरू भेदा आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. राखी सावंत हे सोपं नाव तिनं चित्रसृष्टीसाठी धारण केलं. आज राखी सर्वश्रुत आहे. तिनं चांगलं नाव कमावलं आहे. ती अत्यंत चांगली डान्सर आहे.

राखीने बिग बॉस १४मध्ये भाग घेतला. कारण तिला पैशांची गरज आहे. तिची आई कॅन्सरशी झुंज देत आहे, म्हणून तिला पैसे हवे आहेत. अन्‌ त्यासाठी काम करायचे आहे.

Photo Courtesy: Instagram (All Photos)

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’