पिंक बिकिनी घालून राखी सावंतने दाखवला आपला कमनी...

पिंक बिकिनी घालून राखी सावंतने दाखवला आपला कमनीय देह; अन् चाहत्यांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलं… (Rakhi Sawant Shares Her Pool Side Photos in Pink Bikini, Asks This Question to The Fans)

ग्लॅमरस इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच प्रकाशझोतात असते. काहीना काही उपद्व्याप करून चाहत्यांच्या संपर्कात राहणं तिला आवडतं. राखी सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते आणि स्वतःचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. राखीची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त असल्याकारणाने राखीने एखादी पोस्ट टाकली, की ती लगेच वाऱ्यासारखी पसरते. आताही राखीने तिचे हॉट फोटो इंटरनेटवर शेअर करून नेटचे वातावरण तापवले आहे. पिंक बिकिनी घालून राखीने आपल्या कमनीय देहाचं प्रदर्शन करत चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे.

Rakhi Sawant in Pink Bikini

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

राखी सावंतने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर स्विमिंग पूलजवळील आपले हॉट फोटोज शेअर केले आहेत. पिंक कलरची बिकिनी घातलेली राखी ग्लॅमरस अंदाजात आपला कमनीय देह दाखवत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय – ‘मी स्विमिंग कॉश्च्युम घालू शकत नाही, असं लोकांना वाटतं, पण मी टू-पीस ही घालू शकते. लोकांना वाटतं मी लठ्ठ आहे, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो?’

Rakhi Sawant in Pink Bikini

आपण फोटोंमध्ये पाहू शकतो की, राखी बिकिनी घालून कॅमेऱ्यासमोर कशा वेगवेगळ्या पोज देत आहे. राखी सावंतचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत आणि राखीचे चाहते तिच्या या फोटोंना पसंतीही दर्शविताना दिसताहेत. एका नेटकऱ्यानं राखीला लिहिलंय की, तू अतिशय हॉट दिसते आहेस… तू व्यवस्थित शेपमध्ये आहेस. तर दुसऱ्या एका चाहत्याने तिला तू लाजवाब दिसत आहेस, असं म्हटलं आहे. चाहत्यांकडून मिळणाऱ्या भरघोस प्रतिक्रियांमुळेच राखीला काहीना काही अंतरंगीपणा करायला प्रेरणा मिळत असावी बहुतेक…

Rakhi Sawant in Pink Bikini

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम