जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ : राखी सावंतने केली खान...

जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ : राखी सावंतने केली खान बंधूंची तारीफ (Rakhi Sawant Said, ‘Best Brothers Of The World’)

राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देते आहे. तिच्या मदतीसाठी सलमान आणि सोहेल या खान बंधूंनी आपला हात पुढे केला आहे. सोहेल खानने या संदर्भात एक व्हिडिओ प्रदर्शित करून राखीला मदतीचे आश्वासन दिले आहे. सदर व्हिडिओ राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोहेल त्यात म्हणतो – माय डिअर राखी, तुला किंवा तुझ्या मम्मीला कोणतीही मदत लागली तर मला फोन कर. मी तुझ्या मम्मीला कधी भेटलो नाही. पण तू जितकी स्ट्राँग आहेस, तितकीच ती स्ट्राँग असणार. ती लवकर बरी व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. तू एक चांगली मुलगी आहेस, अन्‌ कायम अशीच राहा. सगळं काही चांगलं होईल. जेव्हा तुझी आई बरी होईल, तेव्हा मी तिच्याशी बोलेन. ऑल दी बेस्ट राखी.

राखी सावंतने यावर सोशल मीडियावर उत्तर दिले. त्यात ती म्हणते -” सलमान आणि सोहेल, तुम्ही माझे जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहात.” त्याचं असं आहे की, राखी सावंत बिग बॉसमध्ये काम करत होती, तेव्हा तिची आई जया सावंत कॅन्सरशी लढत होती. मुंबईच्या एका हॉस्पिटलात तिची केमोथेरपी चालू आहे. जे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत, त्यांची सलमानशी ओळख आहे, अशी माहिती राखीनेच दिली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

राखी सावंत बिग बॉसच्या १४व्या भागात होती, तेव्हा सलमान खानने तिला नेहमीच झुकतं माप दिलं होतं. तिथे घरातल्या लोकांशी तिने वाईट वर्तणूक केली तर सलमान नेहमीच तिची बाजू घेत राहिला. सलमानच्या मनात राखीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे, हे आता सगळेच ओळखून आहेत. त्यामुळे आता राखीची आई कॅन्सरने ग्रस्त आहे, अन्‌ सलमान व सोहेल अशी दोघांचीही भरपूर मदत तिला मिळते आहे.