प्रियकरासोबत राखी सावंतने गाठलं पोलीस स्टेशन; प...

प्रियकरासोबत राखी सावंतने गाठलं पोलीस स्टेशन; पहिल्या पती विरोधात नोंदवली तक्रार (Rakhi Sawant reached police station to file a complaint against her ex-husband Ritesh)

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारी प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतने (Rakhi Sawant) एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत चक्क रडताना दिसत असून तिचा प्रियकर तिला सावरताना दिसत आहे.

खंर तर राखी आणि रडणे हे समीकरण न पटणारं आहे. पण या व्हिडीओमध्ये (viral Video) राखी सावंत पूर्वाश्रमीचा नवरा रितेशवर संशय घेत असल्याचे दिसत आहे. राखी शनिवारी रात्री ओशिवरा पोलीस स्टेशनला गेली होती. तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेरच मीडियाने तिची वाट अडवली.

यावेळी पोलीस ठाण्याच्या बाहेर मीडियाशी बोलताना तिने सांगितले की, “मला माहित आहे की मी तीन वर्षे कशी काढली. लॉकडाऊनमध्येही एकटे पडले होते. म्हणूनच मी त्याला सोडले. देवाने असा पती कोणाला देऊ नये. आता त्याच्याविरुद्ध तक्रार करत आहे.”

राखीचं पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण म्हणजे तिचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. यामागे तिचा पूर्वाश्रमीचा नवरा रितेश असल्याचं ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

राखी सावंतने सांगितले की, “तिला गलिच्छ मेसेज येत आहेत. चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्याने मला फसवलं आहे. तो माझा फोनही उचलत नाही. त्याने मला छळलं आहे. धक्के मारून घरातून बाहेर काढलं आहे. पण मी कधीही तक्रार केली नाही. पण आता त्याने माझ्या सोशल मिडियावर अकाऊंटवर अटॅक केला आहे, तो माझा अश्लील व्हिडिओही पोस्ट करू शकतो.”

त्याचवेळी, अभिनेत्रीचा प्रियकर आदिल दुर्रानीने सांगितले की, त्याने सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही. आदिल म्हणाला, ‘अनेक प्रयत्न करूनही ती लॉग इन करू शकत नाही. ती यापुढे तिचे गुगल पे किंवा तिचा फोन देखील ऍक्सेस करू शकणार नाही.’

राखीच्या म्हणण्यानुसार, रितेश आता तिचा फोनही उचलत नाही आणि तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घाणेरड्या भाषेत लिहित आहे. रितेश राखीच्या मेसेजलाही प्रतिसाद देत नाही.

राखी बिग बॉस सीझन १४ आणि १५ मध्ये दिसली होती. यासोबतच ती तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र इन्स्टा आणि फेसबुक हॅक झाल्यामुळे ती नाराज झालेली दिसली.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / विरल भयानी)