गुंडांपासून बचाव करण्यासाठी केले लग्न; राखी साव...

गुंडांपासून बचाव करण्यासाठी केले लग्न; राखी सावंतचा सनसनाटी खुलासा ( Rakhi Sawant Made Her Wedding; Claims She Got Married To Ward Off A Goon)

बेधडक विधाने करून सदैव चर्चेत राहण्याबद्दल राखी सावंत आता प्रसिद्ध झाली आहे. बिग बॉसचा १४ वा सीझन संपल्यावर राखी सावंत, मजेदार विधाने करून चर्चेत राहिली आहे. अन्‌ लोकांचे मनोरंजन करते आहे. तिचे चाहतेही बरेच आहेत. पण आपल्या खासगी आयुष्यात ती कायम गोंधळलेली असते. विशेषतः लग्नाबाबत. त्या विषयावर राखीने आणखी एकदा सनसनाटी विधान केले आहे.

पतीने मला दगा दिला

अलिकडेच एका मुलाखतीत राखीने सांगितले की, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, असं माझा नवरा रितेशने मला सांगितले. पण करोनाजन्य परिस्थितीमुळे तो मला भेटायला येऊ शकत नाही. मी त्याची वाट पाहते आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मी काही खोटं खोटं लग्न केलेलं नाही. तो अन्य एखाद्या बाईसोबत राहिल, हे मला सहन होणार नाही. पण त्याने मला दगा दिला आहे. माझ्याशी लग्न करण्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे. कोणाची निवड करायची, याचा निर्णय त्याने घ्यायचा आहे.

रितेश आधीपासून विवाहित असून एका मुलाचा बाप आहे

नवऱ्याच्या वयाबद्दल विचारलं तेव्हा राखीने सांगितलं की, ” रितेश ३७-३८ वर्षांचा आहे. त्याचं लग्न झालं आहे नि त्याला मुलगा आहे, हे मला माहीत नव्हतं. तरी पण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या हृदयात त्याला स्थान आहे. आधी करत नव्हती, पण आता माझं त्याच्यावर प्रेम आहे.”

हे लग्न असफल झालं, तर मी पुन्हा लग्न करणार नाही

मी आयुष्यात बरेच कठोर निर्णय घेतले आहेत. आता जर माझं लग्न असफल झालं, तर पुन्हा मी लग्न करण्याच्या फंदात पडणार नाही. रितेशने माझ्यावर व माझ्या आईवर पुष्कळ पैसे खर्च केले आहेत. मुंबईत एक फ्लॅट घेऊन देण्याचं वचन त्यानं मला दिलं आहे.

गुंडांपासून बचाव करण्यासाठी हे लग्न केलं

ज्याला ती धड ओळखत देखील नव्हती, अशा व्हॉटस्‌ ॲप मित्राशी तू लग्न का केलंस, असं विचारताच राखी म्हणाली- ”लोक मिठाई खाण्याबद्दल अधीर असतात. तर मी लग्न करण्याबद्दल अधीर होते. मी गोव्यात असताना गुजरातच्या एका गुंडाने मला लग्न करण्याबाबत जबरदस्ती केली होती. मी त्याच्याशी लग्न केलं नाही तर पळवून नेण्याची त्यानं धमकी दिली होती. मी खूपच घाबरले होते. तशातच रितेशचा कॉल आला. तेव्हा मी त्याला म्हटलं की, माझ्यासाठी एखादं चांगलं स्थळ सुचव. तर तो स्वतःच लग्नाला तयार झाला.”

राखीशी लग्न कोण करणार, असं लोकांना वाटत होतं

माझ्याशी लग्न कोण करणार, असं सगळ्यांना वाटत होतं, असं सांगून राखी पुढे म्हणाली, “मी फारच वादग्रस्त असल्याने माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं त्यावेळी माझ्याबाबत बोललं जात होतं. मी कोणाची आई पण होऊ शकत नाही. पण कां हो, इथे तर बरेच लोक वर्षानुवर्षे तुरुंगात जीवन कंठतात. त्यांचंही लग्न होतंच ना! मुलंही होतात. मी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. मी इंडस्ट्रीत एक डान्सर आहे. मग काय झालं? अखेरशेवटी रितेश लग्नाला तयार झाला. त्याने आपलं बँक खातं पण मला दाखवलं. माझ्या जीवनातील अडचणी संपल्या असं वाटलं, पण… “

राखी सावंत नेहमीच चर्चेत असते, हे आता सर्वांना माहीत आहे. तिने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले होते. पण पतीसोबत असल्याचे फोटो तिने दिले नव्हते. त्यामुळे तिचे लग्न सुरुवातीपासूनच चर्चेत आले होते. बिग बॉसमध्ये देखील तिच्या लग्नाचा आणि नवऱ्याचा उल्लेख आला होता.