मस्तानीच्या वेषात राखी सावंत रस्त्यांवर शोधतेय्...

मस्तानीच्या वेषात राखी सावंत रस्त्यांवर शोधतेय्‌ आपल्या बाजीरावाला (Rakhi Sawant In Mastani Look Spotted At Lokhandwala In Mumbai, Says She Is Unable To Meet Husband Ritesh)

बिग बॉस फेम ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत बाजीराव मस्तानी चित्रपटातील मस्तानीच्या गेटअपमध्ये मुंबईतील लोखंडवाला परिसरात रस्त्यावर भटकताना स्पॉट केली गेली. राखी बोलली, मी आता माझा पती रितेशला कधीच भेटू शकणार नाही… काय आहे हा मामला…?

लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी नौटंकीबाज राखी सावंत काही ना काही उपद्वाप करत असते. आज तिचा मस्तानी वेषातील लूक सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात तिला अशा वेषात भटकताना पाहून त्याबद्दल विचारले असता, तिने म्हटले की, ती खूप दुःखी आहे. कारण ती आपला नवरा रितेशला आता कधीच भेटू शकणार नाही.

राखी सावंतने बाजीराव चित्रपटातील मस्तानीचा ड्रेस आणि पगडी देखील घातली आहे. शिवाय तिने हातात वीणाही घेतली आहे. आपल्या ह्या अवताराबाबत राखी म्हणते, ‘मी मीरा सुद्धा आहे आणि मस्तानी सुद्धा; आणि मी खूप दुःखी आहे.’

राखी सावंतने सांगितले की, ती ‘खतरों के खिलाड़ी’ शो मध्येही जाऊ शकली नाही आणि आता ‘नच बलिए’ शो देखील बंद होणार असल्याचे तिला कळले आहे. त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला रितेशला कधीच भेटू शकणार नाही.

राखीला रियॅलिटी शो ‘नच बलिए’ मध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आले होते, ज्यामुळे ती रितेशला भेटू शकणार होती. परंतु ‘नच बलिए’ शो बंद होणार असल्याचे तिला कळले नि त्यामुळे तिला रितेशला भेटता येणार नसल्याचे दुःख होत आहे, असे राखीने सांगितले. आपल्या नेहमीच्या नाटकी अंदाजाने ती म्हणाली – ‘लोखंडवाला मार्केट बंद आहे, सर्व मॉल्स देखील बंद आहेत, म्हणून मी अशा मस्तानी अवतारात बाजीरावाला शोधत येथे भटकत आहे.’ गंमत म्हणजे तेथील एका डब्बेवाल्याला, तू बाजीराव आहेस का, असं तिनं विचारलं. त्यावर डब्बेवाल्यानं मी बाजीराव नाही, असं तिला उत्तर दिलं.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी आपल्या बिनधास्त बोलांमुळे नेहमीच चर्चेत असते. ‘बिग बॉस १४’ मध्ये राखी सावंतने दर्शकांचं खूप मनोरंजन केलं आणि शो संपल्यानंतरही ती सतत काही ना काही मजेशीर खोड करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.

कधी भाजीवाल्याकडे, तर कधी कॉफी शॉपच्या बाहेर लोकांचं मनोरंजन करताना राखी दिसत असते. राखीच्या या बिनधास्त वागण्यामुळेच तिचे भरमसाठ फॅन फॉलोइंग आहेत. राखीच्या अशाच मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी तिचे चाहते आसुसलेले असतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)