राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीशी केलं लग्...

राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीशी केलं लग्न! फोटो व्हायरल (Rakhi Sawant Got Married To Boyfriend Adil Durrani Photos Went Viral On Social Media)

‘ड्रामा क्वीन’ म्हटली जाणारी टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या बाहेर आल्यापासून चर्चेत आहे. बिग बॉसच्या बाहेर आल्या आल्या तिला आईच्या आजाराबद्दल कळलं, अन्‌ एका व्हिडिओतून तिने ती बातमी चाहत्यांना देत आई बरी व्हावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आणि आता तिच्याशी संबधित एक मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत लग्न केले आहे.

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या गळ्यात हार आहेत आणि त्यांनी त्यांच्या विवाहाचं प्रमाणपत्रही सोबत दाखवलं आहे. ही बातमी समजल्यानंतर राखीचे चाहते खूप खूश आहेत. मात्र, राखी किंवा आदिल यांच्याकडून अद्याप लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दुसऱ्या फोटोत राखी सावंत कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्यावर राखी सही करत असल्याचं बोललं जात आहे. आदिलही तिच्या जवळच बसला आहे.

राखी आणि आदिलच्या विवाह प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दोघांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आहेत. मात्र, यावर लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिली आहे. त्यावर आणखी एक तारीख नमूद केली आहे २ जुलै २०२२. राखी आणि आदिलचे लग्न गेल्या वर्षीच झाले होते का असा प्रश्न आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. अन्‌ झाले असले तरी ते आत्ता एवढ्या उशिरा लोकांसमोर आणण्यामागे काय कारण असेल?