अनन्या पांडेची कॉपी करून राखी सावंतने पारदर्शक ...

अनन्या पांडेची कॉपी करून राखी सावंतने पारदर्शक गाऊन घातला, अन् युजर्सनी तिची टिंगल केली… (Rakhi Sawant Gets Brutally Trolled As She Copies Ananya Panday’s Party Look)

ड्रामा क्वीन राखी सावंतने काहीही केले तरी ते व्हायरल व्हायलाच हवे. नुकतेच राखीने एका इव्हेंटमध्ये असा ड्रेस घातला होता, ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. राखीने चांदीचा चमकदार थाई हाय स्लिट ड्रेस घातला होता आणि विशेष म्हणजे अनन्या पांडेने देखील काही दिवसांपूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या सीईओच्या वाढदिवसाच्या पार्टीत तसाच ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसवरून अनन्यालाही खूप ट्रोल करण्यात आले कारण अनन्याच्या आधी मलायका अरोराने देखील असाच ड्रेस परिधान केला होता.

पारदर्शक थर असलेला हा ड्रेस मोनोकिनीसारखा आहे. त्यामुळे आता सेलेब्सनी स्विमवेअरला पार्टीवेअर करून टाकले आहे की काय? असे बोलून युजर्स टिंगल करत आहेत.

राखीने खरंतर तिला न शोभणारा ड्रेस घातला अन्‌ हील्स घातली आहेत, त्यामुळे ती रेलिंगला धरून खाली उतरतेय. त्यामुळे तिने स्वतःच स्वतःचे हसे करून घेतले आहे. युजर्सपैकी कोणीतरी तिच्या केसांतील ॲक्सेसरीज्‌साठी असेही म्हटले की, ते तिच्या डोक्यावर नाही तर फ्लॉवर पॉटमध्ये चांगलं दिसतं. काहींनी तिला एलियन म्हटलंय्‌, काहींनी जोकर म्हटलं, तर काहींनी राखीला पाठिंबाही दिला आहे.

अनन्याचा हा लूक होता

राखी चांगली एंटरटेनर आहे यात शंका नाही पण कधी कधी ती जास्त नाटकी वाटते. बिग बॉसनंतर पती रितेशपासून विभक्त झाल्यानंतरही सोशल मीडियावर दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यांच्यामधील ते नाट्यही बरेच रंगले होते.