श्रीदेवीची नक्कल करत राखी सावंत झाली नागीण (Rak...

श्रीदेवीची नक्कल करत राखी सावंत झाली नागीण (Rakhi Sawant Copied Veteran Actress Sridevi, Shares Funny Video Of Her ‘Naagin’ Look)

काहीना काही उचापती करून राखी सावंत सदैव सोशल मीडियावर चर्चेत राहते. चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत, त्यांचे मनोरंजन करण्याची कला तिला चांगलीच अवगत आहे. म्हणून तिला ड्रामा क्विन बोलतात. तिनं आता श्रीदेवीची नक्कल करून, तिच्यासारखा ‘नागिन’चा अवतार धारण करून आपला एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर राखी सावंतने श्रीदेवी अभिनित ‘नगिना’चा लूक पेश केला आहे.

Photo Credit: Instagram

या चित्रपटातील ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मै नागिन तू सपेरा’ या गाण्याचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये श्रीदेवीच्या ऐवजी राखी दिसते आहे. म्हणजेच तिने श्रीदेवीच्या चेहऱ्यावर आपला चेहरा पेस्ट करून हा मजेदार व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तो बघून तिचे चाहते खूप हसत आहेत.
या व्हिडिओसोबत राखीने असा मजकूर प्रसिद्ध केला आहे की, ”श्रीदेवी माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे व तिचा ‘नगिना’ हा चित्रपट मला तितकाच आवडतो. याचा रिमेक बनवायचा असेल, तर कुणाला तिची भूमिका दिली पाहिजे?” असा प्रश्न टाकून राखीने चाहत्यांना उत्तर  देण्याचे आव्हान केले आहे.

Photo Credit: Instagram

अलिकडेच राखीने जाहीर केले होते की, तिच्या जीवनावर आधारित जावेद अख्तर चित्रपट बनवू इच्छितात. तर लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पण जावेद अख्तर यांनी या वृत्तास दुजोरा देऊन राखीवर अविश्वास दाखविणाऱ्यांची बोलती बंद केली.

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

Photo Credit: Instagram

चार-पाच वर्षांपूर्वी विमान प्रवासात राखी आपल्याला भेटली होती. तेव्हा तिने आपल्या बालपणाच्या काही गोष्टी सांगितल्या. त्यावरून तिच्या जीवनावर चित्रपट लिहिण्याची आपली इच्छा असल्याचे जावेद साहेबांनी कबूल केले आहे. राखीची आई कॅन्सरशी झुंज देत असल्याने आपल्या खासगी जीवनात ती बेचैन आहे. ती हॉस्पिटलात असून उपचार घेते आहे. तिथे राखी तिला भेटते तेव्हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. ते पाहून सोहैल खानने राखीला मदतीचा हात पुढे केला आहे.

Photo Credit: Instagram

प्रियंका चोप्राला उरोज वाढविण्याचे व कपडे उतरविण्याचे सल्ले दिले होते… कुणी दिले?