शर्लिन चोपडाने राखी सावंतची अश्लील भाषा वापरल्य...

शर्लिन चोपडाने राखी सावंतची अश्लील भाषा वापरल्यामुळे केली पोलिसांत तक्रार(Rakhi Sawant Arrested After Sherlyn Chopra’s Complaint For Using ‘Objectional Language’)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतच्या अडचणी कमी होत नाहीत. नुकतेच शर्लिन चोप्राने ट्विटरवर, ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केली’ असे लिहिले. हे ट्विट शर्लिन चोप्राच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले आहे.

राखी सावंतला अटक झाल्याची माहिती मॉडेल शर्लिन चोप्राने सोशल मीडियावर ट्विट करून दिली आहे. हे ट्विट शर्लिनच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले आहे. ट्विट करताना शर्लिनने लिहिले की, आंबोली पोलिसांनी राखीला अटक केली आहे. शर्लिनने या ब्रेकिंग न्यूजसोबत एफआयआरचा नंबरही शेअर केला होता.

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आदिल दुर्राणीसोबत लग्न झाल्यापासून राखी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सध्या राखी सावंतला आंबोली पोलिसांनी शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीच्या आधारे ताब्यात घेतले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर राखी डान्स अॅकॅडमी लॉन्च करणार होती. तिचा नवरा आदिलही या डान्स अकादमीचा भागीदार आहे.

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. दोघीही उघडपणे एकमेकांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरतात. गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने राखीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी राखीला अटक करण्यात आली आहे.

राखी सावंतच्या अटकेची पुष्टी करताना, अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विट केले – आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला.

शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शर्लिनने राखीवर आरोप केला आहे की राखीने पत्रकार परिषदेदरम्यान तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि तिच्यासाठी आक्षेपार्ह भाषा वापरली.