राखी सावंत आणि पति रितेश यांचे लग्न (लग्नाचे ना...

राखी सावंत आणि पति रितेश यांचे लग्न (लग्नाचे नाटक) संपुष्टात, सोशल मीडियावर नोट लिहून केली अधिकृत घोषणा (Rakhi Sawant announces separation with husband Ritesh, releases a joint statement)

सतत चर्चेत राहण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंत काही ना काही युक्ती शोधून काढत असते. आता कालचेच बघा, व्हॅलेंटाईन दिवसाच्या एक दिवस आधी तिने पती रितेश सोबत घटस्फोट घेतल्याची घोषणा करून सगळ्यांना चकित केले. सोशल मीडियावर त्यासंबंधीत निवेदन देऊन तिने तिच्या घटस्फोटाची बातमी कळवली आहे.

राखीचं लग्न हा खरोखरच रहस्यमय विषय आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. मागे तिने तिच्या लग्नाची बातमी आणि वधूच्या जोडप्यात तिचे फोटो शेअर केले होते, परंतु तिने कधीही तिच्या पतीचा चेहरा दाखवला नाही. तेव्हापासून तिचे लग्न चाहत्यांसाठी रहस्य बनून राहिले. पण ‘बिग बॉस १५’ मध्ये राखी सावंतने पती रितेशला जगासमोर आणून हा सस्पेन्स संपवला. मात्र, बिग बॉसच्या घरात राहूनही दोघांमधील नाते फारसे चांगले दिसले नाही. दोघांमध्ये प्रेम कमी आणि भांडण जास्त होते. घरातून बाहेर पडल्यानंतर कदाचित त्यांचे नाते सुधारेल अशी आशा राखी सावंतला होती, पण तसे झाले नाही. आणि अखेर तिने पती रितेश सिंगसोबतचे सर्व संबंध तोडले. तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करून पती रितेशपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे.

राखीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे –  “ प्रिय चाहते आणि हितचिंतकांनो, मी आपल्याला कळवू इच्छिते की, रितेश आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॉस शो नंतर बरेच काही घडले आणि मला अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, ज्यांची मला माहिती नव्हती, ज्यावर माझे नियंत्रण नव्हते. आम्हा दोघांमध्ये सर्व काही सुरळीत व्हावे यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. परंतु, वेगळे होऊन आपापल्या जीवनात आनंदी राहण्यातच आमचे हित होते. हे सर्व व्हॅलेंटाईन डेच्या आधी घडले त्यामुळे मी खूप दुःखी आहे आणि माझे हृदय तुटले आहे, परंतु हा निर्णय खूप महत्त्वाचा होता आणि तो दोघांसाठी चांगला असेल.”

राखीने पुढे लिहिले की, “आशा आहे की रितेशच्या आयुष्यात यापुढे सर्व काही ठीक होईल. मला आता माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि स्वतःला आनंदी आणि निरोगी ठेवायचे आहे. मला समजून घेतल्याबद्दल आणि माझ्या निर्णयाचे समर्थन केल्याबद्दल सर्वांचे आभार. राखी सावंत.”

राखी सावंतच्या या पोस्टवर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक राखीला सपोर्ट करत आहेत, तर अनेक यूजर्स राखीचं हे नवीन नाटक असल्याचे म्हणत आहेत. ते म्हणतात की, हे सर्व लोकांना आधीच माहित होते. हे आधीच ठरलेले होते. दोघांनी फक्त ‘बिग बॉस १५’ साठी हे सर्व नाटक केले आणि शेवटी नाटक संपले.