राजकुमार रावला हवीय शहनाज गिलसारखी साधी, सुंदर ...

राजकुमार रावला हवीय शहनाज गिलसारखी साधी, सुंदर मुलगी; बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारताच अभिनेत्याने केला खुलासा (Rajkummar Rao Wants A ‘Sweet-Simple And Beautiful’ Daughter Like Shahnaz Gill, Reveals About Baby Planning)

बॉलिवूड अभिनेता राजकुमारचा ‘मोनिका ओ डार्लिंग’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे राजकुमार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राजकुमार राव पंजाबी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शहनाज गिलच्या चॅट शोमध्ये दिसला होता, तिथे शहनाजने अभिनेत्याशी बाळाच्या नियोजनाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

शहनाज गिलचा नवीन चॅट शो “देसी वाइब्स” नुकताच सुरू झाला आहे. अभिनेत्रीच्या चॅट शोचा पहिला पाहुणा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव होता. राजकुमार आपल्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चॅट शोमध्ये आला होता. शहनाजने शोमध्ये त्याच्यासोबत गप्पांसोबतच मस्तीही केली.

चॅट शो दरम्यान शहनाजने अभिनेत्याशी कुटुंब नियोजनाविषयी चर्चा केली. शहनाजने राजकुमारला विचारले की, नुकतेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-वडील झाले आहेत, मग तू आणि तुझी पत्नी बाळाच्या जन्माचे प्लॅनिंग कधी करत आहात?

यावर राजकुमार हसला आणि म्हणाला, मी बाळाचा विचार कधी करणार हा प्रश्न तर मला माझे घरचेसुद्धा विचारत नाही. खरं सांगू तर मी अजूनतरी या सगळ्याचा विचार केलेला नाही. मला तर मी स्वत: अजून लहान असल्यासारखे वाटते.

यावर शहनाज म्हणाली, जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा बाळाचा विचार कर. पुढे राजकुमार म्हणतो की, मला जर मुलगी झाली तर ती तुझ्यासारखी साधी, गोड आणि सुंदर असावी अशी माझी इच्छा आहे.

पंजाबी अभिनेत्री शहनाजने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपला चॅट शो ‘देसी वाइब्स’ची घोषणा केली होती. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी जे ठरवलं होतं ते घडणार आहे. मला नेहमी राजकुमार रावसोबत काम करायचे होते. आज मी माझा पहिला चॅट शो ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ त्याच्यासोबत शूट केला. माझ्या चॅट शोमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. तू बेस्ट आहेस…”