राज ठाकरेंच्या परिवारातील लाडका श्वान ‘जेम्स’चे...

राज ठाकरेंच्या परिवारातील लाडका श्वान ‘जेम्स’चे निधन (Raj Thackeray favorite Great Dane dog James dies of old age)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील ‘जेम्स’ नावाच्या श्वानाचे सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्स अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल रात्री अखेरचा श्वास घेतला.

आपल्या लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरें भावूक झाले. जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी प्रदर्शित झालेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात.

राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, अन्‌ आता जेम्सही गेला

राज यांचे त्यांच्या घरातील सर्वच श्वानांवर आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम होते. साहजिकच ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनाही कुत्र्यांविषयी जिव्हाळा आहे.