‘बायकोचे माझ्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होत...

‘बायकोचे माझ्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते, म्हणून दिला घटस्फोट; शिल्पाचा दोष नाही’- शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राचा गौप्यस्फोट (Raj Kundra Reacts To Ex-Wife Kavita’s Blame On Shilpa Shetty For Their Divorce, Reveals Kavita Had An Affair With His Brother In Law)

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने आपल्या सोडलेल्या बायकोबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो म्हणतो, ‘माझं पहिलं लग्न शिल्पामुळे मोडलं नव्हतं. बायकोचं, माझ्या मेहुण्याशी अफेअर होतं.’

राज कुंद्राची पहिली पत्नी कविता हिचा एक व्हिडिओ अलिकडे व्हायरल होतो आहे. आपलं लग्न मोडण्यास शिल्पा शेट्टी कारणीभूत आहे, असं त्यामध्ये तिनं सांगितलं आहे. त्यावर राज कुंद्राने ११ वर्षानंतर आपलं तोंड उघडलं आहे. अन्‌ आपल्या माजी पत्नीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज कुंद्राने ‘पिंकव्हिला’स दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे, ”तेव्हा आम्ही सगळे एकाच घरात राहत होतो. आई, पापा, बहीण आणि तिचा नवरा. ते लोक तेव्हा भारतामधून युकेमध्ये सेटल झाले होते. त्यावेळी ही बाई माझ्या बहिणीच्या नवऱ्याशी जवळीक साधून होती. त्याच्या सहवासात ती जास्त वेळ घालवत होती. विशेष करून मी बिझनेस ट्रिपसाठी घराबाहेर जायचो तेव्हा. या दोघांचं मेतकूट जमलं असल्याचं घरच्या लोकांनी माझ्या कानावर घातलं. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.”

राज कुंद्राने पुढे असं सांगितलं आहे, ”माझी बहीण व तिचा नवरा भारतात परतले तेव्हा मला खरं काय ते समजलं. या दरम्यान आम्हाला मुलगी झाली होती. कविता बाथरुममध्ये जास्त वेळ असते, असं माझ्या लक्षात आलं. तिची नुकतीच डिलीव्हरी झाली असल्याने कदाचित तिला बाथरूमला जायला जास्त वेळ लागत असेल, असं मला सुरुवातीला वाटलं. माझा नवरा दुसऱ्याच एका फोनवरून युकेमधील एका बाईशी सतत बोलत असतो, असं माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितलं. फोनवर त्या बाईचे मेसेज पण आहेत. तेव्हा तो नंबर काय आहे, तो मला तिनं कळवला. आता मला संशय येऊ लागला.”

राज कुंद्रा या मुलाखतीत पुढे म्हणतो,” एके दिवशी कविता घरात नसताना, मी तिचा फोन शोधू लागलो. तेव्हा बाथरूममध्ये एका बॉक्समध्ये ठेवलेला तो फोन सापडला. फोन ऑन करून बघितलं तर त्यावर माझ्या मेहुण्याचे मेसेज होते. त्या दिवशी मी खूप रडलो. अगदी उद्‌ध्वस्त झालो होतो. मग मात्र मी बायकोला तिच्या माहेरी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. अन्‌ मुलीच्या बारशाच्या निमित्ताने कविताला माहेरी नेऊन सोडलं. आपल्या ४० दिवसांच्या मुलीला सोडून परत येणं एवढं सोपं नव्हतं.”

तो पुढे असंही सांगतो, ”मी भारतात आलो अन्‌ माझी बहीण व तिच्या मुलांना घरी घेऊन आलो. युकेमध्ये आल्यावर आम्ही कविता आणि वंशला मेसेज पाठविला की, आता आपलं नातं संपलं आहे. अन्‌ दोघांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मुलीचा ताबा मिळविण्यासाठी मी कोर्टाची पायरी चढलो. पण युकेच्या कायद्याने मला मुलीला फक्त भेटण्याची व आठवड्यातून एक दिवस घरी आणण्याची परवानगी दिली. मला तिच्यापासून घटस्फोट पाहिजे होता. सुरुवातीला तिने मोठी मागणी केली. पण चूक आपलीच आहे, हे तिला माहीत होतं, म्हणून ती, काय ते समजली. माझ्या मुलीसह सुखाने राहता येईल म्हणून मी तिला एक घर घेऊन दिलं.”

शिल्पा शेट्टीबद्दल राजने सांगितलं, ” त्यानंतर शिल्पा माझ्या जीवनात आली. आधी आमची दोस्ती झाली, नंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या पहिल्या बायकोला हे कळलं, तेव्हा तिने पैशांची मागणी वाढवली. अन्‌ शिल्पामुळे आमचं लग्न मोडल्याची खोटी कहाणी रचली. शिल्पामुळे लग्न मोडलं ही बातमी माझ्या बायकोच्या वाढदिवसाच्या ११ वर्षानंतर व्हायरल व्हावी, ही फार खेदाची बाबा आहे. पण आता फार झालं. आतापावेतो मी गप्प बसलो होतो. पण आता लोकांना सत्य सांगण्याची वेळ आली.”

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने पहिल्यांदाज आपलं तोंड उघडलं आणि मीडियासमोर आपली कैफियत मांडली. त्यानं आपल्या पहिल्या लग्नाबद्दल जे काही सांगितलं, त्यावरून सगळे हैराण झाले आहेत.