‘राजकपूर हे जगातील सर्वोत्कृष्ट गुरु होते...

‘राजकपूर हे जगातील सर्वोत्कृष्ट गुरु होते’ राहुल रवैल यांची आदरांजली (Raj Kapoor Was The Greatest Guru On The Earth- Rahul Rawail Pays Tribute)

ग्रेटेस्ट शो मॅन म्हणून ख्याती पावलेले राज कपूर यांच्या जीवनावर, त्यांचे निकटवर्तीय दिग्दर्शक राहुल रवैल यांनी ‘राज कपूर : द मास्टर आत वर्क’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे संवाद सत्र गोवा येथील इफ्फी मध्ये झाले. त्यामध्ये राहुल रवैल आणि राजसाहेबांचे सुपुत्र रणधीर कपूर यांनी संयुक्तपणे या पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण केले.
या प्रसंगी बोलताना रवैल म्हणाले, ” राज कपूर हे जगातील सर्वोत्क्रुष्ट गुरु होते. त्यांच्या कडून शिकलेल्या, मुग्ध करणाऱ्या गोष्टी मी कधीच विसरू शकणार नाही. राज कपूर यांच्या चित्रपट निर्मितीची शैली उलगडून दाखवणारे १० अध्याय या पुस्तकात आहेत.”

आपण आपल्याअनेक चित्रपटात राज कपूर यांच्या शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. हे मान्य करण्यात आपल्याला कमीपणा वाटत नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले लव्ह स्टोरी, बेताब, अर्जुन अशा चित्रपटांचे दिग्दर्शन रवैल यांनी केले आहे.

सिनेसृष्टीतील या दिग्ग्ज अभिनेता – निर्माता- दिग्दर्शकाच्या या चरित्राचे प्रकाशन त्यांच्या ९७ व्या जयंती दिनी म्हणजे येत्या १४ डिसेंबर रोजी होणार आहे. राजसाहेबांच्या धाकटे चिरंजीव व लोकप्रिय अभिनेता दिवंगत ऋषी कपूर यांना हे पुस्तक समर्पित करण्यात आले आहे.
नंदकिशोर धुरंधर