राहुल वैद्यने ‘पळपुटा वेडिंग सिंगर’...

राहुल वैद्यने ‘पळपुटा वेडिंग सिंगर’ म्हणून खिल्ली उडविणाऱ्या युजरचा विनोदी शैलीत घेतला समाचार (Rahul Vaidya Slams His Taunting User In Humour)

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेला मराठमोळा गायक राहुल वैद्य सर्वानाच ठाऊक आहे. राहुल वेगवेगळ्या कार्यक्रमात आपली गाणी सादर करत असतो. याशिवाय मध्यंतरी तो बिग बॉसमुळे सुध्दा चर्चेत होता.
राहुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. बिग बॉसमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बिग बॉसमध्ये असताना त्याच्यात आणि अभिनेत्री रुबिना दीलैकमध्ये खूप खटके उडायचे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील फूट पडली. बिग बॉसचा तो सीजन काही वर्षे उलटली असली तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये तू तू मैं मैं अजूनही चालूच आहे.


नुकतंच रुबिनाच्या चाहत्याने ट्विटवर राहुलला टॅग करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
त्यात त्याने ” हा बिनकामाचा निर्लज्ज आणि पळपुटा वेडिंग सिंगर आहे. ” असे म्हटले. यावर राहुलनेही त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देत म्हटले की, ” तुमचं लग्न झालंय का? मी तुमच्या लग्नातसुध्दा गायला येऊ शकतो… पण थांबा माझं मानधन तुम्हाला परवडायचं नाही त्यामुळे बहुतेक आपली भेट पुढच्या जन्मात होईल. “


राहुलच्या या उत्तराने त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. त्याच्या विनोदी बुध्दीचे सर्वजण कौतुक करत आहेत. राहुलची पत्नी दिशा परमार हिने देखील राहुलला पाठिंबा देत अशांच्या नादी लागून वेळ वाया घालवू नकोस असे ट्विट केले.