गणपती विसर्जनावेळी चप्पल न काढल्यामुळे राहुल वै...

गणपती विसर्जनावेळी चप्पल न काढल्यामुळे राहुल वैद्य आणि दिशा परमार झाले जबरदस्त ट्रोल (Rahul Vaidya-Disha Parmar Brutally Trolled For Wearing Slippers During Ganapati Visarjan,Watch Videos)

गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमारची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पण त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत ते गणपती विसर्जनासाठी जात आहे. पण त्यावेळी दोघांनी चप्पल घातलेली पाहायला मिळते.

राहुलच्या हातात बाप्पाची मूर्ती असून राहुल आणि दिशा गणपती बाप्पा मोरया म्हणत विसर्जनासाठी जात असल्याचे त्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या जोडप्याने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. राहुल पांढऱ्या कुर्ता-पायजामामध्ये आहे, तर दिशा पांढऱ्या साडीत दिसत आहे. दोघेही खूप छान दिसत आहेत.  पण उत्साहाच्या भरात ते चप्पल काढायला विसरले आणि तसेच बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले.

बाप्पाला असे चप्पल घालून नेताना पाहून चाहत्यांना खूप राग आला आणि त्यांनी दिशा व राहुलला ट्रोल करायला सुरुवात केली. कमेंटमध्ये एकाने बाप्पाला हातात उचलताना चप्पल टाळावी असा सल्ला दिला आहे.

 तर एका यूजरने दिशा पार्टीसाठी आल्यासारखे वाटते अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की हे मोठे लोक आहेत, त्यांचे पाय घाण होऊ नयेत, म्हणून त्यांनी चप्पल काढली नाही…काहींनी कमेंट केली की, वेळेनुसार सर्व काही बदलत आहे…यूजर्स असेही म्हणतायत की देव तुमच्या हातात आहे, मग तुम्ही चप्पल कशी घालू शकता ? तर काहींचे म्हणणे आहे की पाणी प्रदूषण करण्यापेक्षा घरीच विसर्जन करावे.