राधिका आपटेचा न्यूड व्हिडिओ झाला होता व्हायरल,त...

राधिका आपटेचा न्यूड व्हिडिओ झाला होता व्हायरल,तेव्हा स्वत:लाच ठेवले घरात कोंडून (Radhika Apte’s Nude Video Went Viral, The Actress Was No Longer Able To Show Her Face To Anyone)

सिनेइंडस्ट्रीत असे काही कलाकार असतात जे फारशा चित्रपटांमध्ये काम करत नाही पण जेवढे करतात ते चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. पडद्यावर एखादी भूमिका करताना ती पाहणाऱ्या व्यक्तीला वास्तववादी वाटावी असा राधिकाचा अट्टहास असतो. पण तिचा हाच हट्ट तिला एकदा महागात पडला. तिच्यावर अक्षरश: घरात कोंडून राहण्याची वेळ आली होती.

राधिकाच्या 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या मॅडली चित्रपटातील एका सीनचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमुळे राधिकाचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्या व्हिडिओबाबत राधिकाने एका मासिकाला मुलाखतीत सांगितले. त्यात तिने त्या प्रसंगाचा तिच्यावर खूप परिणाम झाल्याचे म्हटले.

ती म्हणाली, जेव्हा मी क्लीन शेवनचे शूट करत होते तेव्हा माझी एक न्यूड क्लिप व्हायरल झालेली. तेव्हा लोकांनी मला खूप ट्रोल केले. मी 4 दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते. माझा ड्रायव्हर, वॉचमॅन सुद्धा मला त्या क्लिपमुळे ओळखायला लागलेले. ती गोष्ट खरोखरचं माझ्यासाठी लाजिरवाणी होती.

राधिकाच्या म्हणण्यानुसार त्या न्यूड सेल्फीमध्ये ती नव्हतीच. एखादी समजूतदार व्यक्ती तो फोटो पाहून त्यात मी नसल्याचा अंदाज नक्कीच लावू शकते. शिवाय अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काहीच करु शकत नाही. त्यात लक्ष घातला तर वेळ आपलाच वाया जातो.

राधिका आपटेचे लग्न झाले आहे ही गोष्ट फारच कमी लोकांना माहित आहे. तिने 2012 मध्ये विदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. तिने तिचे लग्न झाल्याची गोष्ट वर्षभर लपवून ठेवली होती. राधिका 2011 मध्ये कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. तिथेच त्या दोघांची भेट झाली. राधिकाच्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास ती चित्रपटांपेक्षा वेबसिरीजमध्ये जास्त सक्रिय आहे.