राधिका आपटेला ‘फोन सेक्स’ करण्याची ...

राधिका आपटेला ‘फोन सेक्स’ करण्याची पाळी का आली होती? कारण ऐकून धक्का बसेल तुम्हाला… (Radhika Apte Had To Do Phone Sex Because Of This, Will Be Shocked To Hear The Reason)

बॉलिवूडची अतिशय गुणी, निवडक भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेने चांगलं नाव कमावलं आहे. प्रेक्षक आणि टीकाकारांनी देखील तिचे कौतुक केले आहे. पण कधी कधी तिच्या विधानांनी लोकांना चकित देखील केले आहे. वानगीदाखल हा किस्सा बघा:-

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

राधिकाने बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळविण्यासाठी खडतर परिश्रम केले आहेत. मात्र त्यासाठी इच्छेविरुद्ध काही गोष्टी तिला कराव्या लागल्या होत्या. एका मुलाखतीत तिनेच असा एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. ‘देव डी’ या चित्रपटासाठी तिने ‘फोन सेक्स’ केलेला आहे. अर्थात फोनवरून सेक्सी गप्पा रंगविल्या आहेत. ‘देव डी’ मधील तिच्या भूमिकेचा बराच गवगवा झाला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपलं खाजगी जीवन गुलदस्त्यात ठेवण्याचा राधिकाचा स्वभाव आहे. मात्र आता ती विवाहित असली तरी तिचं नाव पूर्वी तुषार कपूर सोबत जोडलं गेलं होतं. २०११ साली आलेल्या ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटात तुषार तिचा नायक होता. तेव्हा दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र या दोघांनी या बातम्यांवर काहीच प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. राधिका ही नवाजुद्दीन सिद्दीकीची पण ‘क्रश’ बनून राहिली होती, हे फारच कमी लोक जाणतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या सर्वांना सोडून राधिकाने २०१२ साली परदेशी पाहुणा गाठला. बेनेडिक्ट टेलर या लंडनच्या वादकाशी तिने लग्न केलं. आधी ते वर्षभर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

राधिका उत्कृष्ट नर्तकी आहे. त्यामुळे तिने नृत्यकलेत आपलं करिअर घडवावं, असं तिच्या आई-बाबांना वाटत होतं. सिनेमात काम करण्याच्या ते विरुद्ध होते. पण तिच्या भाग्यात काही वेगळंच लिहिलं होतं ना!