अभिनेत्री राधिका आपटेने उघडकीस आणली सिनेसृष्टीच...

अभिनेत्री राधिका आपटेने उघडकीस आणली सिनेसृष्टीची काळी बाजू…(Radhika Apte Disclose Casting Couch Instances In Bollywood Faced By Her )

बॉलिवूड सिनेमांमध्ये दाखण्यात येणारे मोठमोठे सेट, उंची कपडे, स्टाइल, राहणीमान, त्यातील पात्रांची जीवनशैली यामुळे अनेकजणांना बॉलिवूडबद्दल आकर्षण असते. यामध्ये मुलींची संख्या जास्त असते. त्यामुळे या चंदेरी झगमगत्या दुनियेत यायच्या नादात अनेक मुली स्वत:चे घरदार सोडून मुंबईत येतात. पण तिथे गेल्यावर प्रत्येकीचे नशीब साथ देतेच असे नाही. या झगमगत्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी अनेक संकटांना समोरे जावे लागते. इथे आलेल्या प्रत्येकीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जो त्यांच्यासाठी एकप्रकारचे अग्नीदिव्यच असते. अनेकींना कास्टिंग काउचसारख्या प्रकाराला सामोरे जावे लागते. अशाच प्रकारामधून गेलेली एक अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे.

मराठमोळ्या राधिका आपटेने हिंदी सिनेसृष्टीतसुद्धा स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. एका मुलाखतीत राधिकाने तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला. राधिकाने ‘पॅडमॅन’ आणि ‘अंधाधुंध’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय ती वेबसिरीजमध्ये देखील काम करत असते. पण स्ट्रगलिंगच्या काळात तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचे राधिकाने सांगितले. सुरुवातीच्या काळात तिला काही लोक रात्री भेटायला बोलवायचे. पण त्यावेळी ती तिथे जाण्यास स्पष्ट नकार द्यायची.

काही जण तिला ऑडिशन देण्यासाठी बोलवायचे आणि तिच्यासोबत नको ते प्रकार करण्याचा प्रयत्न करायचे. एकदा तर हद्दच झाली, एका व्यक्तीने राधिकाला फोन केला व सांगितले की तुला जर दिग्दर्शकाला भेटायचे असेल तर तुला त्यांच्यासोबत झोपावे लागेल. त्यावर राधिकाने त्या दिग्दर्शकालाच भेटायला नकार दिल्याचे सांगितले. राधिका म्हणाली की बॉलिवूडमध्ये तरी या गोष्टी थेट सांगितल्या जात नाही, पण साऊथकडे मात्र दिग्दर्शकाला भेटायचे असल्यास तुम्हाला त्यांच्यासोबत सेक्स करावा लागेल असे सरळ सांगितले जाते.

राधिका पुढे म्हणाली की, तिने अशा गोष्टींना कधीच भीक घातली नाही. त्यांना तिच्यापर्यंत पोहचू दिले नाही. शिवाय त्यामुळे माझ्या कामावरही कोणताच परिणाम झालेला नाही. ‘वाह, लाइफ हो तो ऐसी’ चित्रपटामधून राधिकाने तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती. हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झालेला. राधिकाने बॉलिवूडसोबतच बंगाली, मराठी, मल्याळम, तेलगु आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.