पहिली पाळी येताच राधिका आपटेने दिली होती पार्टी...

पहिली पाळी येताच राधिका आपटेने दिली होती पार्टी (Radhika Apte Celebrated Her First Period With A Party)

रुपेरी पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनात अतिशय बिनधास्त वागणारी आणि मनमोकळेपणाने बोलणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेचा बोलबाला आहे. आपल्याकडे अद्यापही मासिक पाळीबद्दल बोलताना संकोचल्यासाररखे वाटते. पण राधिका आपटेने या बाबत  खुल्लमखुल्ला प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विषयावर, म्हणजेच आपल्या जीवनात आलेल्या पहिल्या मासिक पाळीबद्दल निःसंकोचपणे बोलत असलेल्या राधिका आपटेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ २०१८ सालचा आहे. जेव्हा या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झालेल्या पत्रकार परिषदेत राधिका आपटेने कोणताही संकोच न बाळगता केलेले हे विधान आहे. त्यामध्ये राधिका सोबत अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हा दिसत आहेत.

राधिकाने त्यामध्ये सांगितले होते की, माझ्या फॅमिलीतच डॉक्टर आहे. त्यामुळे आपल्याला मासिक पाळी येणार असल्याची कल्पना मला मोकळेपणाने देण्यात आली होती. मात्र कधी येणार ते मला कळत नव्हतं. पण माझी पहिली पाळी आली, तेऱ्हा माझ्या आईने घरी पार्टी ठेवायला सांगितले. या पार्टीला आमच्या कुटुंबातील बरीच माणसे व मित्रपरिवार जमला होता. आम्ही जोरदार सेलिब्रेशन केलं. प्रत्येक जण मला गिफ्ट घेऊन आले होते. मी खूश झाले होते. सुरुवातीला दुकानातून सॅनिटरी पॅडस्‌ विकत घ्यायला, आपल्याला संकोच वाटत होता, याची कबुली पण राधिकाने दिली आहे. नंतर मात्र बिनधास्तपणे, मोठ्या आवाजात मागून आपण संकोच घालविला असल्याचे ती सांगते.