३ इडियट्स फेम् आर माधवनलाही कोरोनाची लागण (R Ma...

३ इडियट्स फेम् आर माधवनलाही कोरोनाची लागण (R Madhavan has tested positive for corona virus)

थ्री इडियट्‌स फेम आर. मधावनने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. म्हणजेच आमीर खानच्या मागोमाग आर माधवन यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
आमीर खाननंतर लगेचच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या माधवनने राजू हिरानी यांच्या थ्री इडियट्‌स या चित्रपटाचा संदर्भ देत सोशल मीडियावर आपली कोरोनाची चाचणी सकारात्मक आली असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असं म्हटलं आहे की, ”फरहान नेहमीच रांचोचे अनुसरण करत आला आहे आणि नेहमीप्रमाणे आमच्या मागे व्हायरस आहे. परंतु यावेळेस तो अधिक त्रासदायक झाला आहे. पण सध्या ऑल इज वेल आहे आणि कोरोनाही लवकरच बरा होईल. जरी हे एक ठिकाण असलं तरी आमच्यातील तिसऱ्या इडियटने राजुने याठिकाणी यायला नको. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मी लवकरच बरा होईन.”

माधवनने आपला कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. माधवनने नुकताच भोपाळमधील अम्रीकी पंडितच्या सेटवरून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला कॅप्शन देत अभिनेत्याने “भोपाळमध्ये शूट करा…असंख्य सावधगिरीने”  असे म्हटले आहे.
माधवन  मागे अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘मारा’मध्ये दिसला होता. सध्या तो ‘रॉकेट्री’वर काम करत आहे. यात तो वैज्ञानिक नंबी नारायणनची मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती देखील माधवन करीत आहे.

बॉलिवूडमधील रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, आमीर खान अशा बऱ्याच कलाकारांनंतर आर माधवनची कोरोना चाचणी सकारात्मक आलेली आहे. तेव्हा सर्वच कलाकारांनी कोरोनास गंभीरतेने घेत संबंधित नियमांचे पालन करावे.

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा