करोनाशी लढा देणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी आर. अश्...

करोनाशी लढा देणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी आर. अश्विन यंदाच्या आयपीएलमधून काही काळ विश्रांती घेणार (R Ashwin Takes A Break From IPL 2021 To Support Family In Fight Against Covid-19)

भारताचा अव्वल फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतो. यंदाच्या हंगामात अश्विनने पाच सामने खेळले आहेत.  अश्विनने रविवारी सनरायजर्स हैद्राबाद सोबत झालेल्या सामन्यानंतर आपला हा निर्णय घोषित केला. त्याने ट्वीटवरून अशी माहिती दिली की, मी आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून काही काळ विश्रांती घेत आहे. माझे कुटुंबीय आणि नातलग कोव्हिडविरुद्ध लढा देत आहेत आणि या संकटकाळी मी त्यांच्या सोबत राहू इच्छितो. सर्व स्थिती पूर्ववत झाली तर मी पुन्हा खेळायला येईन. धन्यवाद!” 

अश्विनच्या ट्वीटनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्यांनीही अश्विनच्या कुटुंबियांस लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे आणि या अवघड परिस्थितीत आम्ही तुझ्यासोबत आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

अश्विनच्या या ट्वीटवर इतर क्रिकेटर्स देखील, त्याने संयमीत राहावे आणि त्याच्या परिवारास लवकर बरे वाटावे यासाठी कामना करत आहेत.

यापूर्वीही अश्विनने करोनाग्रस लोकांच्या मदतीसाठी सक्रिय सहभाग दिलेला आहे. ‘हा विषाणू कोणालाही सोडत नाही, या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला माझ्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास कृपया मला सांगा, मला जेवढी मदत करणे शक्य आहे, तेवढी मदत करण्याचं मी वचन देतो, असं अश्विनने आपल्या ट्‌वीटमध्ये लिहिलं होतं.

माझ्या देशावर चारी बाजूंनी आलेलं हे संकट पाहून माझं काळीज तुटतंय. मी आरोग्य क्षेत्राशी निगडीत नाही, परंतु मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मी माझ्या देशबांधवांना विनंती करतो की स्वतःची काळजी घ्या, जागरूक आणि सुरक्षित राहा.

फोटो सौजन्य – ट्वीटर