सर्दीवर झटपट उपाय काय? (Quick Remedies For Cold)

सर्दीवर झटपट उपाय काय? (Quick Remedies For Cold)

हमखास बरी करणारी औषधं सध्या तरी आपल्याकडे नाहीये. आपण करतो, डॉक्टर सुचवितात, ते निव्वळ प्रयोग. यापैकीच एक सोपा प्रयोग म्हणजे साध्या गरम पाण्याची वाफ घेणे.
वाढतं प्रदूषण, वातावरणातील विषमता, अ‍ॅलर्जी, धुळीचं साम्राज्य अशा कारणांनी आपल्याला सर्दी होत असते. नाक वाहतं, शिंका येतात, जीव हैराण होतो. आपण झटपट उपाय म्हणून इनहेलर वापरतो, बाम लावतो, नाहीतर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर अ‍ॅन्टीबायोटिक्स गोळ्या देतात. या सर्व उपायांनी तात्पुरतं बरं वाटतं. पण खरं सांगायचं तर, सर्दी बरी करणारं, झटपट बंद होणारं मुळी औषधच नाहीये. आपण करतो, डॉक्टर सुचवितात, ते निव्वळ प्रयोग. अक्सीर इलाज नाहीच, असं तज्ज्ञांचं मत आहे.


कॅरो युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय विभागातील प्रोफेसर माजेद बहगत यांनी या संदर्भात अभ्यास केला नि असा निष्कर्ष काढला की, 200 हून अधिक व्हायरसने आपल्याला सर्दी होते. या व्हायरसशी झुंज द्यायला ज्या लशी आहेत, त्यांचा आकडा तेव्हढाच आहे. त्यामुळे होतं काय की, सर्दीवर जी औषधं आपण घेतो, त्याच्याने काही व्हायरसेसवर परिणाम होतो, पण बाकीची सक्रिय राहतात. काही वर्षांपूर्वी लहान मुलांवर शास्त्रज्ञांनी काही प्रयोग करून पाहिले. अन् त्यांच्या हे लक्षात आलं. त्यांचं असंही म्हणणं आहे की, सर्दी देणार्‍या व्हायरसेसना नष्ट करणारी काही औषधं तयार होतील. परंतु सध्या तरी हमखास बरी करणारी औषधं आपल्याकडे तयार नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेले अ‍ॅन्टीबायोटिक्स हाच आपला आधार आहे. मात्र आमची असे सूचवितो की, साध्या गरम पाण्याची वाफ घेतली, तर तिच्यात सर्दी बरी करण्याचं सामर्थ्य आहे. पाहा प्रयत्न करून…